60 baby snakes tremble Poisonous baby snake found in cowshed in Madhya Pradesh Watch shocking scene Saam Tv
व्हायरल न्यूज

गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

Shocking Snake Video: सोशल मीडियावर सध्या अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. एका गोठ्यात तब्बल ६० नागिणीची पिल्ले सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

MP Viral News: मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातून अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यात तब्बल ६० नागिणीचे पिल्ले सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना इतकी धक्कादायक होती की तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच तो काही तासांतच व्हायरल झालेला आहे.

गोठ्यात अचानक हालचाल जाणवली

ही घटना मंदसौर जिल्ह्यातील एका लहानशा गावात घडली आहे. स्थानिक शेतकरी आपल्या जनावरांना खायला देण्यासाठी गोठ्यात गेला होता. दरम्यान त्याच्या लक्षात आलं की, जमिनीखाली काही हालचाल होतेय. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं.मात्र, काही क्षणातच एक बारीक साप(Snake) गोठ्यातून सरपटत जाताना दिसला.

शंका आल्यामुळे शेतकऱ्याने गावकऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांनी लगेच सर्पमित्रांना आणि वनविभागाला कळवले. काही तासांतच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांचेही डोळे विस्फारले गेले.

एक-दोन नाही, तब्बल ६० सापांचे पिल्ले!

सर्पमित्रांनी जेव्हा गोठ्यातील एका कोपऱ्याची माती बाजूला काढली तेव्हा तिथून एक-दोन नाही, तर तब्बल ६० नागाची पिल्ले बाहेर आले. ही सर्व सापाची पिल्लं कोब्रा जातीची होती. अंदाजे प्रत्येक साप ८ ते १२ इंच लांब होता. इतक्या मोठ्या संख्येने साप एकत्र दिसणे हे अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक मानले जाते.

स्थानिकांच्या उरात धडकी

या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे (fear) वातावरण पसरले आहे. अनेकांनी आपल्या घरांच्या आजूबाजूच्या भागात सफाई मोहीम राबवली. मुलांना बाहेर न खेळण्याचे आदेश दिले गेले. गावातील अनेक नागरिक गोठा आणि घराच्या परिसरात काळजीपूर्वक फिरत आहेत.

टीप: हा सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT