Mumbai News Saam Tv
व्हायरल न्यूज

Lalbaugcha Raja Viral Video : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुरक्षारक्षकांचा मुजोरीपणा, बाप लेकीला ढकलले आणि...

Mumbai News : लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी सुरक्षारक्षकांच्या गैरवर्तणुकीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाप-लेकीला दर्शनापासून दूर खेचल्याने संताप व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • लालबागच्या राजाच्या मंडपात सुरक्षारक्षकांची भाविकांशी गैरवर्तणूक

  • बाप-लेकीला दर्शनापासून बाहेर खेचल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • सोशल मीडियावर संताप व्यक्त; "राजा सर्वांचा की श्रीमंतांचाच?" असा प्रश्न

  • भरती आणि तराफ्यामुळे विसर्जन २५ तासांपासून रखडले

मुंबईतील नागरिकांचे श्रद्धास्थान आणि मानाचा गणपती म्हणून लालबागच्या राजाकडे पहिले जाते. अवघ्या महाराष्ट्रातून भाविक राजाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. गणेश भक्त तब्बल ११ दिवस राजाची मनोभावे पूजा करतात. राजाच्या चरणावर मस्तक ठेवून चरणस्पर्श करण्यासाठी भक्त तासंतास रांगेत उभे असतात. त्यासाठी मंडळाकडून सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येतो. मात्र या वेळेस लालबागच्या मंडपात या सुरक्षारक्षकांचा मुजोरीपणा पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओतील चित्रीकरणाप्रमाणे, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त मंडपात दर्शनासाठी उभे होते. जस जशी लाईन पुढे जात होती तसं तसे भाविक राजाच्या चरणी नतमस्तक होत होते. मात्र येथील सुरक्षा रक्षकांनी एका सामान्य कुटुंबातील बाप लेकीला दर्शन घेताना चुकीची वागणूक दिल्याचं समोर आलं आहे.

एक व्यक्ती त्याच्या मुलीला राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी घेऊन गेला असता तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना ओढलं. संतापलेल्या चिमुरडीच्या वडिलांनी संताप व्यक्त करत उलट जबाब विचारला असता गेटवरच्या काही सुरक्षारक्षकांनी मुलीला आणि तिच्या वडिलांना खेचत थेट बाहेरचा रास्ता दाखवला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र सर्वसामान्य माणसांसाठी लालबागचा राजा नाही का ? तो फक्त श्रीमंतांचाच आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या घटनेवर मंडळाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच समुद्रात आलेल्या भरतीमुळे आणि यावर्षी आणलेल्या नव्या तराफ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अडथळे निर्माण होत आहेत २५ तास उलटूनही अद्याप राज्याचे विसर्जन झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT