Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जगंल सफारीसाठी गेले अन् घडलं विपरीत; धडकी भरवणारा व्हिडीओ पहा

Shocking Viral Video: सोशल मिडियावर सध्या जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात नक्की धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.नक्की काय घडले पहा.

Tanvi Pol

Jungle Safari Shocking Video: सोशल मीडियावर जंगल सफारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकांना जंगल सफारी हा एक थ्रीलिंग अनुभव वाटत असतो. मात्र अनेकदा जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांचा थील्लरपणा आपणास पाहण्यास मिळतो तर अनेकदा जंगलातील प्राणी पाहून पर्यटक खूप खुश होतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका जंगल सफारीचा आहे,ज्यात पर्यटकांसोबत एक भयानक घटना घडते.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, पर्यटकांनी भरलेली एक जीप आहे जी जंगलातून फिरत आहे आणि विविध प्राणी पाहत आहेत. जंगलातून जात असताना पर्यटकांनी भरलेल्या जीप समोर अचानक वेगात एक गेंडा येतो आणि जीपच्या दिशेने जात असतो. धावत येत्या गेंड्याला पाहून जीप चालकाने ती जिपच उलट्या दिशेने चालवण्यास सुरुवात करतो. जीपच्या पाठी मागे आपल्याला वन विभागाचा एक कर्मचारी स्कुटीवर आहे तो ही पळताना दिसत आहे, मात्र उलट्या दिशेने जीप येताना ती रस्त्याच्या कडेला कलंडली जाते आणि सर्व प्रवासीही त्यामधून पडतात. सर्व घटना पाठीमागे असलेल्या एका पर्यटकाने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठल्या विभागातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर १००० हून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर व्हिडिओचे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

जंगल सफारीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''मला खात्री आहे की प्राणी हसत आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''आयुष्याचा शेवटचा दौरा'' तर अजून एका यूजरने लिहिले,''माझ्या अंदाजानुसार बॅकअप कसा घ्यावा हे ड्रायव्हरला माहित नव्हते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT