Sangli News Lathicharge Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Police Lathi Charge: आली का बाईक दे रट्टा; सांगलीत यात्रा संपल्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद

Sangli News Lathicharge Video: मायाक्का देवीची यात्रा संपवून येताना हुल्लडबाजी करणाऱ्या सांगलवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. बाईकवरून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलाय.

Bharat Jadhav

कर्नाटकातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला मायाक्का देवीची यात्रा सुरू आहे. ही यात्रा दरवर्षी माघ महिन्यात चिंचली येथे आयोजित केली जाते. मायाक्का देवी ही मातृशक्तीचे एक रूप असून तिची पूजा प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात आणि दक्षिण महाराष्ट्रात केली जाते. ही यात्रा संपल्यानंतर बाईकवरून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलाय.

यात्रा संपल्यावर घरी परत येत असताना हुल्लडबाजी करणाऱ्या सांगलवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झालेत. तर काहीं तरुणांनी गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला. मायाक्का देवी मंदिर कर्नाटकातील चिंचली येथे आहे. या देवीच्या नावाने येथे यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेच्या ठिकाणी चिंचणीला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भावी परंपरेप्रमाणे जात असतात.

त्यांच्या जोडीला दुचाकी मोठ्या प्रमाणात असतात. ही यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात. याचवेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकी असतात, असे प्रत्येक वर्षी असते. मात्र रविवारी रात्री दोन हजाराहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते, अशी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून त्यांना रट्टा दिला. तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढला.

प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा

कर्नाटक -महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध शक्ती, आणि नवसाला पावणारी देवी आहे. मायाक्का देवीची यात्रा महिनाभर यात्रा चालते. प्रत्येक वर्षी ही यात्रा भारत पौर्णिमेच्या दिवशी सुरूवात होते. यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री मायाक्का देवीची पालकी मिरवणूक कार्यक्रम होत असतो.

ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भक्त श्री मायाक्का दर्शनासाठी यात्रेच्या काळात येतात. महाराष्ट्रातील, कोकण भागासह, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, भीड यासह कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा या जिल्ह्यातील भाविक प्रत्येक वर्षी यात्रा काळात स्वच्छ भावनेने चिंचली येथे श्री मायाक्का दर्शनासाठी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT