Royal Enfield Bullet 350 Old Bill Saam
व्हायरल न्यूज

८०च्या दशकात रॉयल एनफील्ड बुलेटची किंमत किती होती? जुनं बिल सोशल मीडियात व्हायरल

Royal Enfield Bullet 350 Old Bill From 1986: रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ची सर्वत्र क्रेझ. बाईकचं जुनं बिल सोशल मीडियात व्हायरल. पाहा किती किंमत होती?

Bhagyashree Kamble

  • ८० च्या दशकात रॉयल एनफील्ड बुलेट ३५० ची किंमत किती होती?

  • बाईकचं जुनं बिल व्हायरल.

  • ४ दशकांनंतरही बाईकची क्रेझ कायम.

रॉयल एनफील्ड बुलेट ३५०ची तरूण वर्गामध्ये भयंकर क्रेझ आहे. या बाईकचा आवाज ऐकूनच लोक ओळखू शकतात. तरूणांपासून मध्यमवयीन लोकांपर्यंत सर्वजण ही बाईक आवडीनं खरेदी करतात. रॉयल एनफील्ड बुलेट ३५० बाईक चालवताना आपल्याला रॉयल फिल येतो. त्यामुळे बरेच जण ही बाईक हमखास खरेदी करतात. सध्या या बाईकची किंमत २ लाख रूपयांपेक्षा जास्त असेल. पण १९८६ साली या बाईकची किंमत किती होती? ठाऊक आहे का?

जवजवळ चार दशकांपूर्वी या बाईकची किंमत खूपच कमी होती. आताच्या तुलनेत बाईकची किंमत १० पट कमी होती. रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० ची ३९ वर्षे जुनी किंमत जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर रॉयल फिल्ड ३५० या बाईकचं जुने बिल तुफान व्हायरल होत आहे. हे बिल १९८६ चे असल्याची माहिती आहे.

१९८६ साली बाईकची किंमत १८,७०० रूपये असल्याचं बिलमधून समोर आलं आहे. ही किंमत ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसला असेल. हे बिल सोशल मीडियात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर या बिलाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. बाईक प्रेमींनी रॉयल एनफील्ड बुलेट ३५०चं १९८६ सालचं बिल पाहून आश्चर्य व्यक्त केला आहे.

तर, काही जणांनी त्यावेळच्या १८,७०० रूपये किंमतीची तुलना आजच्या लाख रूपयांशी केली. १९८६ सालीही रॉयल एनफिल्ड ३५० ही बाईक खूप लोकप्रिय होती. त्याकाळीही या बाईकची प्रचंड क्रेझ होती. मात्र, आता १८,७०० रूपयांत महागातला मोबाईल मिळणं देखील अशक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT