Police Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Police Viral Video: एम्स रुग्णालयात सहाव्या मजल्यावर पोलिसांनी नेली कार; महिला डॉक्टरला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

AIMS Rishikesh Hospital viral video: ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एम्स रुग्णालयात चक्क पोलिसांनी कार नेली आहे. एम्स रुग्णालयातीस सहाव्या मजल्यावरील इमरजन्सी वॉर्डमध्ये पोलिसांनी कार नेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एम्स रुग्णालयात चक्क पोलिसांनी कार नेली आहे. एम्स रुग्णालयातीस सहाव्या मजल्यावरील इमरजन्सी वॉर्डमध्ये पोलिसांनी कार नेली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एम्स रुग्णालयातील नर्सिंग अधिकाऱ्याने महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी चक्क हॉस्पिटलमध्येच कार नेली आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. यूपी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी कार इमरजन्सी वॉर्डमध्ये नेली आहे. इमरजन्सी वॉर्डमध्ये कारला पुढे जाण्यासाठी जागा मोकळी केली जात होती. यासाठी रुग्णांच्या स्ट्रेचर हलवण्याच येत होत्या. यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियर हेल्थ फॅसिलिटीमधील ऑपरेशट थिएटरमध्ये एका नर्सिंग अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. याच आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कार डायरेक्ट वॉर्डमध्ये नेली आहे. नर्सिंग अधिकारी सतीश कुमारला निलंबित करण्यात आले आहे, असे ऋषिकेशचे पोलिस अधिकारी शंकर सिंग बिश्त यांनी सांगितले.

या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टरांना आंदोलन केले होते. त्यांनी गुन्हेगाराला निलंबित करण्याची मागणी केली होती. यासाठी हॉस्पिटलबाहेर घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांना रुग्णालयात जाण्यासाठी दुसरा कोणता मार्गच नव्हता. त्यामुळे त्यांनी कार घेऊन रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आरोपीला एकदम बॉलिवूड स्टाईलने अटक केले आहे. यामुळे मात्र, इमरजन्सी वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिजिटल होम अरेस्टच्या नावाखाली फसवलं, १ कोटी लुबाडले, पुण्यातील वृद्धाचा हृदयविकारानं मृत्यू

SEBI Recruitment: खुशखबर! सेबीमध्ये सरकारी नोकरीची संधी; ग्रेड ए पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Marathi Actor : आणखी एक मराठी अभिनेता अडकणार लग्नबंधनात, 'या' अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळ निवळलं? राज्यात पावसाचा जोर कायम, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Live News Update: निलेश घायवळच्या आई -वडिलांना पुणे पोलिसांचे पत्र

SCROLL FOR NEXT