Plastic Bottle Water Saam Tv
व्हायरल न्यूज

Plastic Bottle Water: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान! रियूज बाटलीत टॉयलेटपेक्षा 40 हजार पटीनं बॅक्टेरिया?

Viral Satya : आता बातमी तुम्हाला सावध करणारी, तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटलीतून वारंवार पाणी पित असाल तर तुमच्यासाठी ते अत्यंत घातक आहे. या पाण्यात टॉयलेटपेक्षा 40 हजार पटीनं जास्त बॅक्टेरिया असतात असा दावा सोशल मीडियात केला जातोय.

Mayuresh Kadav

अलिकडच्या काळात बाटलीबंद पाणी पिण्याचं प्रमाण वाढलंय. हे पाणी सर्वात शुद्ध पाणी असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे सगळेतच जण बिनधास्तपणे हे पाणी पितात. एकदा पाणी प्यायल्यानंतर आपण ती बाटली घरातही वापरतो. मात्र हीच रियूज बाटली तुम्हाला आजारी पाडू शकते. या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असल्याचा दावा केला जातोय. याबाबत एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊ..

व्हायरल मॅसेज

प्लास्टिकच्या बाटल्या रियूज करणं आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे तुम्हाला गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. हे पाणी प्यायल्यानं आतड्यांना इजा पोहचू शकते.

अमेरिकेतील एका नामांकित संस्थेचा हवाला देऊन हा मेसेज व्हायरल केला जातोय. पाणी हेच जीवन आहे आणि त्यातच जीवघेणे बॅक्टेरिया असतील तर आजारांना निमंत्रण मिळाल्याशिवाय़ राहणार नाही. त्यामुळे साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आम्ही याबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या पडताळून पाहिल्या. तेव्हा काय सत्य समोर आलं, ते जाणून घेऊ...

व्हायरल सत्य

प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्याबाबत अमेरिकेतील वॉटर फिल्टर गुरु या संस्थेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात रियूज होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किचन सिंकच्या तुलनेत दुप्पट बॅक्टेरिया असल्याचा दावा करण्यात आलाय. मानवी तोंड हे बॅक्टेरियाचं सर्वात मोठं घर आहे. त्यामुळे एका पाण्याच्या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. हे प्रमाण पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांपेक्षा 14 पटीनं अधिक आहे. यावरून रियूज होणारी प्लास्टिकची बाटली किती घातक आहे याची कल्पना येते. प्लास्टिकच्या बाटलीमुळे तुम्हाला गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.

रियुजेबल बाटली घातक

या पाण्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. गॅस्ट्रो, आतड्यांचे विकार होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे यावर ऍन्टिबायोटिक्सही उपयोगी ठरत नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत रियूज प्लास्टिक बाटल्यांमध्ये बॅक्टेरिया असल्याचा दावा सत्य ठरलाय. मात्र टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असण्याबाबत भारतीय तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहे. तुम्हाला आजारांना दूर ठेवायचं असेल तर प्लास्टिक पेक्षा मेटल किंवा तांब्याच्या बाटल्यांचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT