Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

पठ्ठ्याने पार्ले जी बिस्किटांपासून बनवलं हुबेहूब राम मंदिर; VIDEO एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of making Ram Mandir By parle G Biscuits:

येत्या २२ जानेवारीला अयोद्धेत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यासाठी अनेक भाविक उपवास, व्रत करत आहेत. मात्र, एका भाविकाने चक्क बिस्किटाचे चक्क हुबेहुब राम मंदिर साकारले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

राम मंदिराच्या उद्घाटनाची अयोद्धेत जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी देशभरातून भाविक अयोद्धेत दाखल होताना दिसत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शहरातील भाविक रोज पूजा करताना दिसत आहे. एका भाविकाने चक्क २० किलो पार्ले जी बिस्कीटांचे राम मंदिर साकारले आहे.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती पार्ले जी बिस्किटचे राममंदिर साकारताना दिसत आहे. त्या व्यक्तीने बिस्किटांना वेगवेगळे आकार देत राममंदिर उभारले आहे. गमच्या साहाय्याने ही बिस्किटे चिटकवलेली आहेत. हे राम मंदिर साकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या शेवटी राम मंदिर पूर्ण झाल्याचे दिसत आहे. हे राममंदिर खूपच सुंदर दिसत आहे.

durgapur_times या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. राम मंदिर बनवणाऱ्या व्यक्तीचे खूप कौतुक केले आहे. कमेंटमध्ये युजर्संनी भगवान रामाचा जयघोष केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT