Raksha Bandhan 2023 Saam Tv
व्हायरल न्यूज

Raksha Bandhan 2023 : आता राखीनंतर मेहंदीवर QR Code; भावाकडून गिफ्ट मिळवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

Raksha Bandhan Special Gift : बहिणीने भावाकडून रक्षाबंधनचे पैसे घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mehendi Scanner Video : धमाल, मस्ती, मज्जा करणारं नात म्हणजे भाऊ- बहिणीचं नातं. भावाबहिणीचं नात नेहमीच खास असतं. आज देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे. आज बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. आणि भावाकडून गिफ्ट घेते. आता एका बहिणीने भावाकडून एका अनोख्या पद्धतीने पैसे घेतले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या जग डिजिटल झाले आहे. पैसे ट्रान्सफर करतानाही ऑनलाईन अॅपचा वापर करतात. एका बहिणीने भावाकडून रक्षाबंधनचे पैसे घेण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. तिने मेहंदीवरच क्यू आर कोडचा छाप काढला आहे.

आजकाल सर्व काही ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने होते. पैसे पाठण्यासाठी क्यू आर कोडचा वापर करतात. अनेक बहिणींनी चक्क राखीवरच क्यूआर छापण्याची आयडिया केली. राखीनंतर आता एकीने तर हातावरच्या मेंहदीवरच क्यूआर कोड छापला आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत बहिणीने हातावर मेंहदी काढली आहे. मेंहदीवर तिने चक्क क्यू आर कोड छापला आहे. कोणालाही हा क्यू आर कोड स्कॅन होणार नाही असे वाटेल. परंतु जेव्हा भावाने क्यू आर कोड स्कॅन केला. तेव्हा मात्र खरंच पेमेंटचा पर्याय आला.

या व्हिडिओला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आजकाल जग खूप पुढे जात आहे. याचा प्रत्यय या व्हिडिओतून आला आहे. ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या अंत्यविधीची तयारी सुरू

Maharashtra Closed : राज्यातील 'ही' शहरे राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?

Ajit Pawar Death: अजित पवारांचा अकाली मृत्यू, बारामती हळहळली, कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू | VIDEO

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar passed away: अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार अत्यंसंस्कार

SCROLL FOR NEXT