कार चालवताना मोबाईल वापरल्यानं अपघात होण्याची घटना घडल्याचं आपण बऱ्याचवेळा ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. पण कार चालवताना मोबाईलवर बोलत असल्याने एखाद्याचा जीव वाचल्याचं घटना ऐकलीय कधी. नसेन कदाचित, पण नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आर्श्चयकारक घटना घडलीय. कार नदीत बुडत असताना मोबईलमुळे दोन मित्रांचा जीव वाचलाय. नांदगाव तालुक्यातील साकोरा जतपुरा रस्त्यावरती ही घटना घडली. योगेश निकम आणि त्यांचा मित्र कारमधून शेतावर जात होते. त्यावेळी योगेश निकम हे त्यांचे मेहुणे सतीश बोरसे यांच्याशी फोनवर बोलत होते. तेवढ्यात त्याची कार नदीत गेली. त्यावेळी गाडी पाण्यात चालली वाचवा, असे सतीश बोरसे यांना ऐकायला आले. काही कळण्याच्या आत योगेश निकम आणि त्यांचा मित्र शाकांबरी नदीत बुडाली. सतीश बोरसे यांनी शेजारी राहणाऱ्या नाना बोरसे यांना फोन करून घटनास्थळी पाठवले. त्यावेळी नाना बोरसे यांनी तेथील स्थानिक लोकांना सोबतीला घेतला आणि योगेश निकम आणि त्यांच्या मित्राचा जीव वाचवला. सतिष बोरसे,नाना बोरसे,ललित बोरसे,अमोल हिरे,सुकलाल हिरे, प्रशांत बोरसे यांनी दोघा मित्रांचा जीव वाचवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.