Nagpur Metro Viral Video: ड्रामा आन् रोमँटीक व्हिडीओनंतर मेट्रो ट्रेनमध्ये फॅशन शो; भन्नाट VIDEO व्हायरल
Fashion Show In Nagpur Metro : मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा डबल डोस. मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोला भांडण-तंटा, डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रो आता कपलसाठी स्पॉटच बनला आहे. आता दिल्ली मेट्रोनंतर नागपूर मेट्रोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर भांडण, डान्स , प्रेमवीरांचे व्हिडिओ पाहिले असतील. परंतु कधी फॅशन शो करतानाचा व्हिडिओ पाहिला आहे का? असाच एक फॅशन शो नागपूर मेट्रोत झाला आहे. अनेक मुलींनी एकत्र येऊन हा फॅशन शो केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये मेट्रोमध्ये अनेक मुलींनी फॅशन शो केल्याचे दिसत आहे. २८ ऑगस्ट रोजी हा फॅशन शो झाला आहे. वीकेंड असल्याने या दिवशी मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गर्दीतही या मुलींनी फॅशन शो करुन प्रवाशांचे मनोरंजन केले. वेगवेगळ्या रंगाचे, डिझाइनचे कपडे घालून त्यांनी हा फॅशन शो केला आहे.
विशेष म्हणजे, या फॅशन शोमध्ये २ ते ५० वयापर्यंतचे लोक सहभागी होते. मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषा करुन हा शो केला. नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मॉडेल्सनी परिधान केलेले कपडे हे फॅश इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केले होते.
ही नागपूर मेट्रोची एक योजना आहे. 'सेलिब्रेशन ऑन व्हिल्स' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत, विविध संस्था, व्यक्तींना फि आकारुन असे कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाते. व्हिडिओत प्रवासीदेखील या फॅशन शोचा आनंद घेताना दिसत आहे.
ट्विटरवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. नागपूरमधील मेट्रोतील फॅशन शोने प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रवाशांचे फॅशन शोच्या माध्यमातून मोफत मनोरंजन झाले. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.