Jaipur Earthquake Viral Videos Saam TV
व्हायरल न्यूज

Jaipur Earthquake Viral Videos: जयपूरमध्ये भूकंपाने भल्यापहाटे जमीन हादरली, लोक घराबाहेर पळतच सुटले; धडकी भरवणारे VIDEO पाहाच

Earthquake Viral Videos: इर्शाळवाडी गावाची दुर्घटना ताजी असतानाच जयपूरमध्ये भूकंपाचे झटके जाणवल्याने काही नागरिकांनी भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी धावपळ केली.

Ruchika Jadhav

Jaipur Earthquake Viral Videos: शुक्रवारी राजस्थानची राजधानी जयपूर भूकंपाने हादरली. पहाटेच्यावेळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. त्यामुळे सर्वजण घराबाहेर पडताना दिसले. इर्शाळवाडी गावाची दुर्घटना ताजी असतानाच जयपूरमध्ये भूकंपाचे झटके जानवल्याने काही नागरिकांनी भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. (Latest Marathi News)

झालेल्या भूकंपात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर #earthquake ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर भूकंपावेळचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. या व्हिडिओमध्ये नागरिकांची धावपळ दिसत आहे. यातीलच काही व्हायरल व्हिडिओ पाहूयात.

पहाटे ४ वाजून ९ मिनीटांनी भूकंपाचे झटके जाणवले होते. यावेळी हादऱ्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालीये. एका व्हिडिओमध्ये काही जनावरे दिसत आहेत. जमीन हादरताच ते देखील भयभीत होऊन सैरभैर पळत आहेत.

व्हिडिओमध्ये (Video) भूकंप आल्यावर संपूर्ण जमीन हादरताना दिसत आहे. तसेच या भूकंपाची भीषणता देखील तुम्ही अनुभवू शकता. येथे भूकंपानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज काळजात धडकी भरवणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT