Mumbai Rain Viral Video: अखेर तो दिवस आला! मुंबईकरांचा गाड्या सोडून होड्यांमधून प्रवास; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

Heavy Rains Mumbai Viral Video: व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी अखेर तो दिवस आलाच! असे म्हणत प्रशासनाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Heavy Rains Mumbai Viral Video
Heavy Rains Mumbai Viral VideoSaamtv
Published On

Mumbai Rain Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने जिकडे तिकडे पाणी साचले असून अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. मोठमोठे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातून मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे.

मात्र अशा परिस्थितीतही मुंबईकरांनी असा पर्याय काढला. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये विरारमधील नागरिक चक्क बोटीमधून प्रवास करताना दिसत आहेत. मुंबईतल्या वॉटर टॅक्सीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video News)

Heavy Rains Mumbai Viral Video
Why landSlide Increase in Sahyadri : सह्याद्री का खचतोय? इर्शाळवाडी दुर्घटना भविष्यातीत मोठ्या धोक्याचा इशारा, Explained

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई (Mumbai) शहर, उपनगरात मुसळधार पावसाने मुक्काम ठोकला आहे. मुंबई, तसेच उपनगरांत बुधवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

पण नेहमी अचडणींवर पर्याय शोधणाऱ्या काही मुंबईकरांनी प्रवासासाठी थेट बोटींगचा वापर केला आहे. सोशल मीडियावर विरारमधील (Virar) नागरिकांच्या या बोटींगचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामधून लोक बोटीमधून ये- जा करत असल्याचे दिसत आहे.

Heavy Rains Mumbai Viral Video
Dharmarao Baba Atram : धर्मरावबाबा आत्राम यांना धमकी, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना दिले ठाेस उत्तर

हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी अखेर तो दिवस आलाच! असे म्हणत प्रशासनाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी अखेर अडचणींवर मार्ग शोधलाच असे म्हणत मुंबईकरांच्या या पर्यायी मार्गाचेही जोरदार कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com