मुंबईतील सर्वच चाकरमाणी लोकल ट्रेनने प्रवास करतात. आता प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल देखील दाखल झाली आहे. अशात आता एसी लोकलची बिकट परिस्थिती चव्हाट्यावर आलीये. मुंबई एसी लोकलमध्ये भर उन्हात पावसाच्या धारा कोसळताना दिसल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात एसी व्यस्थित चालत नसल्याने प्रवाशांवर पाणी गळत आहे. अंगावर पाणी पडत असताना या महिला स्वत:ला सावरून प्रवास करताना दिसतायत.
माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील या ट्रेनने प्रवास केलाय. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फोनमध्ये कैद केलाय. तसेच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत याबाबत त्यांनी भलीमोठी पोस्टही लिहिलीये. यात त्यांनी एसी लोकल ट्रेनची दयनीय परिस्थिती समोर आणली आहे.
वर्षा गायकवाडांची पोस्ट
आज संध्याकाळी 5:50 च्या चर्चगेट बोरिवली एसी लोकलने प्रवास केला. ट्रेनच्या AC मधून बरंच पाणी टपकत होतं, जणू काही पाऊस पडत होता. ट्रेनमध्ये खाली पाणी साचले होते. सर्व प्रवाशांना त्रास होत होता, अनेकांचे सामान भीजत होते, असं वर्षा गायकवाड यांनी लिहिलंय.
माझी सहकारी, मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ६ ऑक्टोबर रोजी याच ट्रेनबद्दल तक्रार केली होती. परंतु आजपर्यंत काहीही बदलले नाही. प्रवासावेळी एसीची आजिवात हवा लागत नव्हती. बोरीवलीत पोहचेपर्यंत आम्ही अगदी घामाघूम झालो होतो, अशा शब्दांत प्रवाशांना होणारा त्रास त्यांनी व्यक्त केलाय.
एसी ट्रेनचे तिकीट इतर सेवांच्या तुलनेत खूप महाग आहे. जेव्हा प्रवाशांकडून इतके पैसे घेतले जातात तेव्हा सर्व सुविधा देणे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे. माझी मागणी आहे की, रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या सर्व एसी लोकल ट्रेनचे सर्वेक्षण करावे आणि सुविधा लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.