Ayodhya Railway Station Saam Tv
व्हायरल न्यूज

Ayodhya Railway Station: फुलांची सजावट, विद्युत रोषणाई... अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचा VIDEO व्हायरल

Ayodhya Railway Station Video: येत्या २२ जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी अयोद्धा धाम रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन झाले. याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Railway Minister Ashwini Vaishnaw Share Video Of Ayodhya Railway Station

येत्या २२ जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अयोद्धा सजली आहे. अयोद्धेत सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी अयोद्धा रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर आता अयोद्धा रेल्वेस्थानकाचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest News)

राममंदिराच्या उद्घाटनासाठी संपूर्ण अयोद्धा सजली आहे. अयोद्धेत विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले आहे. याचाच व्हिडिओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे. अयोद्धा रेल्वे स्थानकाचे नाव अयोद्धा धाम असे ठेवण्यात आले. रेल्वे स्टेशन रोशनाई आणि सजावटीने सजलेले पाहायला मिळत आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अयोद्धा रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात संपूर्ण रेल्वे स्थानकाला रोशनाई करण्यात आली आहे. फुगे आणि फुलांनी सुदंर सजावट करण्यात आली आहे. रंगेबीरंगी लायटिंग करण्यात आली आहे. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अयोद्धा धाम रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिो पोस्ट करत रघुपति राघव राजा राम! सज गया है हमारा अयोध्या धाम!! असं कॅप्शन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम रेल्वे सेटशनवरुन २ अमृत भारत आणि ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या रेल्वेने प्रवाशांना चांगला अनुभव मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Bus Accident : धावत्या बसचा टायर फुटला, २ कारचा चुराडा, भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश

Corporation Election: युती झाली पण लढाई सोप्पी नाही; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपचा प्लान काय?

January Bank Holiday: जानेवारीत बँकात १६ दिवस राहणार बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT