Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लखनऊ - बरौनी एक्सप्रेसमध्ये सापडल्या 325 दारूच्या बाटल्या; रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई

Liquor Seized In Train: बिहारमध्ये दारूबंदी असतानाही रेल्वेतून दारू तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लखनौ-बरौनी एक्सप्रेसच्या छतातून तब्बल ३२५ बाटल्या जप्त करून जीआरपीने कारवाई केली.

Manasvi Choudhary

रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना काळजी घेणे महत्वाचे आहेत. रेल्वेचे काही नियम आहेत ते पाळणे अनिवार्य आहेत. रेल्वेतून मद्यपान करण्यास मनाई आहे तरीदेखील अनेक लोक या चुका करतात. यामुळे इतर प्रवाशांनादेखील त्रास होतो. रेल्वेमध्ये मद्यपान करण्यास आणि नेण्यास मनाई असताना देखील अनेकजण चुका करतात. नुकतंच बिहारमध्ये रेल्वेत दारू जप्त करण्यात आली आहे. रेल्वेच्या छतावर दारूच्या बॉटल्स सापडल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे.

बिहारमध्ये दारूबंदी असूनही तस्करीच्या नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत. १२ ऑगस्ट रोजी असाच धक्कादायक प्रकार रेल्वेमध्ये घडला आहे. लखनऊ जंक्शन आणि बरौनी दरम्यान धावणाऱ्या १५२०४ डाउन लखनौ-बरौनी एक्सप्रेसच्या सेकंड एसी कोचच्या छतामधून सुमारे ३२५ बाटल्या (५७ लिटर) दारू जप्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे जीआरपी एस्कॉर्ट टीम पथक हजर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला त्यावेळी शोध पथकास ३२५ दारूच्या बाटल्या हाती लागल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करत रेल्वे जीआरपीने आरोपीविरुद्ध उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह यांनी घटनेची पुष्टी देत सांगितले की आरोपीविरुद्ध कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT