pune viral video Saam tv
व्हायरल न्यूज

Pune Metro Viral Video: पुणेकरांचा नाद नाही करायचा! काकाने चक्क हात दाखवून मेट्रो थांबवली, व्हिडिओ व्हायरल

पुणेकर काकांनी चक्क हात दाखवून मेट्रो थांबवली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.

Vishal Gangurde

Pune Viral News: पुणेकर नेहमीच त्यांच्या हटके कृत्यासाठी चर्चेत असतात. पुणेकरांच्या पुणेरी पाट्यांची चर्चा देशभर होत असते. याच पुण्यातून भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. एका पुणेकर काकांनी चक्क हात दाखवून मेट्रो थांबवली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेट्रोच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन केले. या नव्याने सुरु झालेल्या मेट्रो स्टेशनवरून अनेक नागरिक प्रवास करताना दिसत आहेत. याचदरम्यान, एका व्यक्तीने हात थांबवून मेट्रो थांबवली आणि बसून गेले आहेत. या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील मेट्रोच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन केले आहे. या स्थानकावर एक व्यक्ती घाईघाईत आला. त्यामुळे प्रवास करण्यासाठी काकाने थेट ड्रायव्हरच्या केबीनचा दरवाजा वाजवला. त्यानंतर दरवाजा उघडण्याची विनंती केली. त्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यानंतर हा व्यक्ती मेट्रोत बसून प्रवास करतो.

दरम्यान, पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एकाने म्हटले आहे की,'हात दाखवा, मेट्रो थांबवा'. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'विनंती थांबा, हात दाखवा मेट्रो थांबवा उपक्रम, इनस्पायर फ्रॉम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ'. अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, या व्हिडिओनंतर काही नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'ही गोष्ट हसण्यासारखी नाही. अशा मेट्रो थांबा अभियान नाही, यामुळे पुढील लोक खोळंबतील'. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'ज्या गोष्टीत अजिबात लॉजिक नाहीये, त्या गोष्टीतही अभिमान वाटावा असं आहे हे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

SCROLL FOR NEXT