Viral social media post falsely claims PM Modi urged citizens to sell gold and deposit money in banks. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: मोदींचा नारा, सोनं विका बँकेत पैसे ठेवा? पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन?

Viral Claim Busted: मोदींनी आता सोनं विका आणि पैसे बँकेत ठेवा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आलाय...व्हायरल मेसेजमध्ये मोदींचा फोटो लावण्यात आलाय...पण, खरंच मोदींनी असं आवाहन केलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

Sandeep Chavan

देशात सध्या महागाई, इंधन टंचाईची समस्या निर्माण झालीय...यातच आता पंतप्रधान मोदींनी सोनं विका आणि आलेले पैसे बँकेत ठेवा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आलाय...व्हायरल होत असलेल्या मेसेजसोबत मोदींचा फोटो आणि त्यांचं नाव लिहिण्यात आलंय...पण, खरंच असं मोदींनी आवाहन केलंय का...? महिलांना सोनं विकून पैसे बँकेत ठेवण्याचं आवाहन मोदींनी का केलं असेल...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

ही सोने खरेदी करण्याची वेळ नाही, तर माता आणि भगिनींनी त्याग करण्याची वेळ आहे. आपल्याकडील सोने विकावे आणि मिळालेले सर्व पैसे आपल्या बँकांमध्ये जमा करावेत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, बरेचजण मेसेज वाचून लगेच निर्णय घेतात...त्यामुळे आधी मोदींनी असं आवाहन केलंय का...? आणि जर आवाहन केलं असेल तर ते कशासाठी...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...मोदींनी कुठे भाषण केलंय का...? याची माहिती मिळवली...तसेच कुठे बातमी आलीय का...? कोणत्या मुलाखतीत ते बोललेयत का...? याबाबत पडताळणी केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

वर्षभर सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केलं होतं

दागिने विकून पैसे बँकेत ठेवण्याचं आवाहन केलेलं नाही

पंतप्रधान मोदींनी असं आवाहन महिलांना केलेलं नाही

दिशाभूल करण्यासाठी चुकीचा मेसेज व्हायरल

अशा कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका...कारण, कुणीही सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून खोटी माहिती व्हायरल करतो...आता हा मेसेज आणि मोदींचा फोटो वापरून व्हायरल केलाय...पंतप्रधानांनी सांगितलंय म्हणून अनेकजण तसं वागू लागतात...त्यामुळे अशी कोणतीही माहिती असेल तर पडताळणी करूनच विश्वास ठेवा...नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं...आमच्या पडताळणीत मोदींनी महिलांना सोनं विकून बँकेत पैसे ठेवण्याचा सल्ला दिल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाढदिवसाचा केक खाणं महागात पडलं, केकचा घास, 3 वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात

५००० रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाचा कर्मचारी रंगेहाथ सापडला; एसीबीने कार्यालयात रचलेला सापळा

इराण-अमेरिकेत पुन्हा युद्ध पेटणार? इराणनं पाडलं अमेरिकेचं हेलिकॉप्टर

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; शिंदे हायस्कूलजवळ एकावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या

अण्वस्त्र सज्जत्तेत भारताचं सर्वात मोठं पाऊल, भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रं तैनात

SCROLL FOR NEXT