Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावर स्टंटबाजी; हेल्मेट नाही, एक हात सोडून दुचाकीवर स्टंट, तरूणाचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Dangerous bike stunt: गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर वारंवार तरुणांचे स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा यातून जीवघेणे अपघातही घडतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Viral stunt video: अलीकडे सोशल मीडियावर धोकादायक स्टंटचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बरेचजण काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालायला तयार झाले आहेत. त्यातच नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका युवकाने दुचाकीवर इतका जीवघेणा स्टंट केला की पाहणाऱ्यांचे हृदय थरथरले. या व्हिडिओवरुन एकच प्रश्न पडतो, याला मृत्यूचीही भीती नाही का?

दुचाकीवर इतका खतरनाक स्टंट केला

या व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण रस्त्यावर वेगात दुचाकी चालवत आहे. मात्र, केवळ अति वेग नाही, तर तो बिनाहेल्मेट आणि कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय स्टंट (Bike Stunt)करताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे तो दुचाकीच्या एका बाजूला बसत स्टंट करत आहे. स्टंटची दृश्यं पाहून अंगावर काटा येतो. इतकं धाडस की क्षणभरही चुकलं असतं, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, संपूर्ण देशभरात या व्हिडिओची चर्चा होत आहे. एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ १२ तासांपूर्वी व्हायरल होताच लाखोंच्या घरात व्हिडिओ पाहिला गेला असून अनेक लाईक्सही मिळालेले आहेत.

सोशल मीडियावर वारंवार असे व्हिडिओ(Viral Video) व्हायरल होताच नागरिकांकडून अनेत संतापजनक प्रतिक्रिया येतात. याही व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी म्हटलं की,''पोलिसांनी बांबूचे चांगलेच फटके देयला पाहिजे'' तर काहींनी म्हटलं आहे की,''हे सुधारणार नाहीत'' शिवाय काहींनी ''फक्त बघा काही म्हणू नका'' अशा मजेशीरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीप: स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT