AKola Railway Station Incindent: Saamtv
व्हायरल न्यूज

Akola News: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न.. जवानांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; थरारक घटना CCTVत कैद

Akola Railway Station Incident: अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक व्यक्ती धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेल्याने तो ट्रेन अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकला. यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ बाहेर खेचत त्याचा जीव वाचवला.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला|ता. ३० एप्रिल २०२४

ट्रेनमध्ये चढताना उतरताना काळजी घेण्याचे आवाहन नेहमी केले जाते. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणे अनेकदा धोकादायक ठरु शकते. अशाच धक्कादायक घटना अकोला रेल्वे स्थानकात घडल्या. अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं दोघांना चांगलेच अंगलट आले. सुदैवाने रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडण्याच्या नादात पाय घसरुन पडल्याच्या दोन वेगवेगळया घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक व्यक्ती धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेल्याने तो ट्रेन अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकला. यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ बाहेर खेचत त्याचा जीव वाचवला.

त्यानंतर दूसऱ्या घटनेत एक महिला चालत्या रेल्वेमध्ये चढत असताना तोल गेल्याने मोठा अपघात झाला. तोल गेल्याने महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जात असताना पोलिस कर्मचारी योगेश तांबस्कर यांनी धाव घेत महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढले. पोलिसांच्या या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. असाच प्रकार या दोन्ही घटनांमध्ये पाहायला मिळाला. दरम्यान, या घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर पाहणी करुन काही वेळानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या दोन्ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

Maharashtra Live News Update: आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

वाढत्या वयानुसार महिलांना व्हाइट डिस्चार्जची समस्या अधिक का सतावते?

SCROLL FOR NEXT