Stone Pelting In Mihir Kotecha Ralley
Stone Pelting In Mihir Kotecha RalleyYandex

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley: भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, मुंबईत वातावरण तापलं

Mahayuti Candidate Rally Campaign In Gowandi: महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना गोवंडीमध्ये घडली आहे. भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीत सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे.

मयूर राणे साम टिव्ही, मुंबई

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना गोवंडीमध्ये घडली आहे. भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या प्रचार ऱॅलीत (Lok Sabha Election) सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा रॅलीवर दगडफेक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत एक महिला जखमी झाली (Stone Pelting In Mihir Kotecha Ralley) आहे.

देवनार गौतमनगर परिसरात रॅली दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जोरात तयारी (Mahayuti Candidate Rally) सुरू आहे. उमेदवार आपापला प्रचार करत आहेत. यादरम्यान बऱ्याचदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक वार होताना आपल्याला (Maharashtra Poliltics) दिसतात. पण अशातच आता दगडफेक झाल्याची देखील घटना घडली आहे.

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley
BJP Manifesto 2024 : भाजप उद्या जाहीरनामा जाहीर करण्याच्या तयारीत; लोकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करणार?

मानखुर्द गोवंडी विभागातमध्ये ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान हा भयानक प्रकार समोर आला आहे. मानखुर्द गोवंडी विभागातील गौतम नगर परिसरात (Mahayuti Candidate Rally Campaign In Gowandi) प्रचार रॅली आली होती. त्यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली. मिहिर कोटेचा यांनी ही दगडफेड विरोधकांनी केल्याचा आरोप केला (Maharashtra Election 2024) आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मुंबईत सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहचलेला आहे. अशातच मिहिर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक (Stone Pelting) झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली दिसत आहे.

Stone Pelting In Mihir Kotecha Ralley
Pune Traffic diversion for PM Modi rally : PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com