Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Tragic Incident Viral Video : काळानं झडप घातली, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Accident Viral Video : मृत्यू कोणावर कधी आणि कसा ओढावेल याचा काही नेम नाही. असं तुम्ही बऱ्याचवेळा पाहिलं असेल. हा व्हिडिओ बघून हळहळ व्यक्त कराल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tragic Incident Viral Video :

हरयाणाच्या पानीपतमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ८० वर्षे जुन्या असलेल्या घराची बाल्कनी अंगावर कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पत्नीच्या डोळ्यांदेखत ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य मन विचलित करणारे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तु्म्ही पाहू शकता की, रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत आहे. तेव्हाच या रस्त्यावरुन एक जोडपं बाईकवरुन जात आहे. अशातच रस्त्यावरून जात असताना अचानक बाईकवर इमारतीचा काही भाग पडतो. पण बाईकवरील महिलेला बाल्कनीचा तो कोसळणारा भाग दिसतो. त्यामुळे ती तात्काळ बाईकवरून उडी मारून बाजूला होते. मात्र बाईकचालकास याची कल्पना नसल्याने त्याच्या अंगावर ढिगारा पडतो. ढिगारा पडताच सर्वत्र धूळ उडाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय हा ढिगारा इतक्या जोरात पडतो की त्याचा आवाज ऐकून बाजारातील लोक धावत घटनास्थळी येतात. जमलेले लोक त्याच्या अंगावर पडलेला ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

@vani_mehrotra या ट्वीटर अंकाऊटंवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सर्व घटना जवळच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ हरियाणातील पानिपत शहरातील आहे. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर एका यूजर्सने लिहिले आहे की, 'या गोष्टीचा तपास करून जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.' कुणावरही अशी वेळ येऊ नये, अशी प्रतिक्रिया अन्य एका यूजरने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT