Baga beach incident saam tv
व्हायरल न्यूज

Video Viral: पॅरासेलिंगदरम्यान दोरी तुटली आणि....! बागा बीचवर धक्कादायक घटना, व्हिडीओ समोर

Baga beach incident: गोव्याच्या बागा बीचवर पॅरासेलिंग दरम्यान दोरी तुटल्यामुळे एक पर्यटक हवेतून खाली पडला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

गोव्याला गेलं की वॉटरस्पोर्ट्स आणि बंजी जंपिंग करण्याचं प्रत्येकाचं मन असतं. असंच गोव्याच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बागा बीचवर पॅरासेलिंग करत असताना एका पर्यटकाचा अपघात टळला आहे. समुद्रात बोटीला जोडलेली पॅरासेलची दोरी अचानक तुटल्यामुळे हा पर्यटक हवेत असतानाच खाली पडला. साधारण १५ फूट उंचीवरून तो समुद्रात पडला, परंतु पॅराशूटमुळे त्याचा वेग कमी झाला आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेनंतर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता बोट फिरवली आणि त्या पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. संबंधित पर्यटकाने लाइफ जॅकेट घातलेले असल्याने त्याला बुडण्याचा धोका टळला. दरम्यान, या घटनेमुळे बोटीवरील इतर पर्यटक घाबरून गेले होते. व्हिडिओमध्ये महिलांच्या किंकाळ्या ऐकू येत असल्याचंही दिसतंय.

कडक कारवाईचा इशारा

या प्रकाराची दखल घेत पर्यटन विभागाने सविस्तर अहवाल मागवला असून निष्काळजीपणा आढळल्यास परवाना निलंबित करण्यासह कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या घटनेनंतर पर्यटनस्थळी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या देखभालीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होताना दिसतायत.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गोव्यातील वॉटर स्पोर्ट्सच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'भारतामध्ये सुरक्षिततेकडे शेवटीच लक्ष दिलं जातं. अशा प्रकारच्या अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीपासून दूर राहिलेलंच बरं,' अशी एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे.

बागा इथल्या एका वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटरने सांगितलं की, अशा प्रकारच्या स्टंटमध्ये काही प्रमाणात धोका असतोच. पॅरासेलिंग दरम्यान बोट बंद पडणं, फ्युएल पंप बिघाड, जोरदार वारे, दोरी तुटणं किंवा मशीनरीतील दोष अशा अनेक कारणांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Honey Singh Case: हनी सिंगला कॉन्सर्टमध्ये घडलेल्या 'त्या' प्रकारावरुन मिळाली वॉर्निंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ओटीपी दिला आणि ओला कार लहान बहिणीला घेऊन निघाली अन् पुढं काय घडलं?

Ashok Kharat CA: पुण्यातील कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा; अशोक खरातच्या सीएची संपत्ती ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT