Panditji Sing 90's Romantic Hindi Songs In Wedding Video Goes Viral On Social Media  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Wedding Video: पंडितजींनी कहरचं केला! हातात माईक घेतला अन् सुर धरला; विधी सोडून गायली रोमँटिक गाणी| VIDEO

Viral Wedding Video: हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे लग्नात भटजींनी केलेली अजब कृती. लग्न लागत असतानाच भटजींनी माईक हातात घेऊन चक्क बॉलिवूडची रोमँटिक गाणी गाताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

Viral Wedding Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे लग्नात भटजींनी केलेली अजब कृती. लग्न लागत असतानाच भटजींनी माईक हातात घेऊन चक्क बॉलिवूडची रोमँटिक गाणी गाताना दिसत आहेत.

लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचे विधी सुरू असतानाच हातात माईक घेऊन चक्क बॉलिवूडची सुपरहीट हिंदी गाणी म्हणायला सुरूवात केली. नवरा- नवरीसमोर भटजींनी हिंदी गाण्यावर सुर धरलेला पाहून पाहुणे मंडळीही चक्रावून गेली. या हटके लग्न सोहळ्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रियीा दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेव- नवरी तसेच पाहुणे मंडळी बसली आहेत. अशातच भटजी हातात माईक घेतात अन् एकापाठोपाठ एक बॉलिवूड गाणी म्हणायला सुरूवात केली. तुझे देखा तो ए जाना सनम, दिल दिवाना ना जाने कब खो गया, अखिया मिलाऊं कभी अखियां चुराऊं.. अशी एकापेक्षा एक सुपरहीट गाणी ते म्हणताना दिसत आहेत.

पंडितजींचा हा रोमँटिक स्वॅग पाहून पाहुणे मंडळीही त्यांना साथ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपल्याही लग्नात हेच भटजी पाहिजेत, अशी मजेशीर मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT