Pakistani Reporter Goes Viral After Reporting Waist-Deep in Dangerous Floodwaters Saam Tv
व्हायरल न्यूज

पाकिस्तानमधील नवा 'चांद नवाब'! पुराच्या पाण्यात उतरून पत्रकाराचा थरारक स्टंट; VIDEO

Viral Journalist Video: पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. एक पाकिस्तानी पत्रकार छातीपर्यंत भरलेल्या पाण्यातून थेट रिपोर्टिंग करताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Pakistan Floods Video: पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बऱ्याच नद्या, नाले आणि ओढ्यांना मोठा पूर आला असून, घरं, रस्ते, आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा(Pakistani) एक पत्रकार थेट छातीपर्यंत भरलेल्या पाण्यात उभा राहून रिपोर्टिंग करताना दिसतो. तो आपल्या प्रेक्षकांसाठी प्रत्यक्ष पूरस्थितीचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा उत्साह, धाडस आणि वृत्तासाठी असलेली निष्ठा पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

रिपोर्टिंग करताना जीवावर बेतू शकतं!

या पत्रकाराचं नाव अद्याप समोर आलं नसलं तरी तो ज्या पद्धतीने पाण्यात उतरून रिपोर्टिंग करतो आहे, त्याने पत्रकारितेतील धाडसाचं एक वेगळंच उदाहरण समोर ठेवलं आहे. छातीपर्यंत भरलेलं गढूळ आणि वेगाने वाहणारं पाणी, इथं कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. पण तरीही तो परिस्थितीचं तंतोतंत चित्र दाखवतो आहे.

सोशल मीडियावर पत्रकाराची वाहवा

या पत्रकाराचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे असून तो व्हिडिओ युट्यूवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी त्याच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं आहे तर काहींनी लिहिलं की, "धाडसी पत्रकार म्हणजे हेच'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं; व्हॉट्सअॅप स्टेटसवर पेशव्यांचा इतिहास काढला, VIDEO

Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

Maharashtra Live News Update: पुण्यात जिम ट्रेनर लेडीने लोखंडी रॉडने मारहाण करून केला तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT