Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अखंड हरिनाम सोहळ्यात तायडीनं गायलं शिवबाचं गाणं; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे!

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय,जो एका ताईने गायिलेल्या एका सुंदर गाण्याचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Social Media Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्यक्ती रातारोत प्रकाश झोतात आलेले आहेत. मुळात सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ व्हायरल होताच तो असंख्य नेटकरी वर्गात पाहिला जातो.मग या व्हायरल व्हिडिओत कधी कुणी थरारक स्टंट केली असेल किंवा कधी कोणी कुठे गाणे गायिले असेल.जर प्रेक्षकांना आवडले तर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतो,सध्या सोशल मीडियावर एका ताईचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय,ज्यात त्या ताईने एक गाणे गायले आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ एका अखंड हरीनाम सप्ताहामधील आहे. यामध्ये अनेक व्यक्ती जमिनीवर बसलेले आहेत. यात एका ताईने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक गीत गायिले आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून या ताईसाठी अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'जय जिजाऊ...जय शिवराय..ताईसाहेब'' तर प्रत्येक यूजरने ताईच्या आवाजाचे सुंदर अशा शब्दात कौतुक केले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @maharashtrian_admin या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''छत्रपती शिवरायांचे हे सुंदर गाण जे या ताईने गावाच्या अखंड हरीनाम सप्ताहात गायल'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ साधारण चार दिवसापूर्वी शेअर करण्यात आला असून साधारण सहाशेच्या घरात नेटकरी वर्गाने लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT