Dog Attack Video Canva
व्हायरल न्यूज

Dog Attack Video: इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; अंगाचे लचके तोडले, भयानक घटना CCTVत कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भयानक घटना आपल्या समोर येत आहेत, या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक वेळा काही व्यक्तींचे जीवही गेले आहेत. मात्र पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात अशीच एक घटना समोर आली आहे,जिथे ग्रेटर नोएडा(noida) परिसरातील एका सोसायटीमध्ये कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला आहे.यात मुलीला दुखापत झालेली आहे. ही संपूर्ण धक्कादायक घटन सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना शुक्रवार ३ मे रोजी घडल्याची सीसीटीव्हीमधून समजते. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, लहान मुलगी लिफ्ट बंद करुन खाली जाण्यासाठी खालील मजल्याचे बटण दाबते.

काही वेळानंतरच लिफ्ट जशी दुसऱ्या मजल्यावर येते,त्याच क्षणी लिफ्टचे दार उघडताच कुत्र्याने(Dog) मुलीवर उडी मारली आणि तिला चावतो. कुत्रा जसा तिला चावतो तसा लिफ्टच्या आत शिरतो मात्र तेवढ्यात एक व्यक्ती कुत्र्याचा पाठलाग करत तिथं पर्यंत येतो. लिफ्टमध्ये शिरलेल्या कुत्र्याला तो व्यक्ती बाहेर काढतो. पुन्हा लिफ्टचा दरवाजा बंद होतो.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी पूर्णपणे घाबरलेली आहे. मात्र कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे तिला दुखापतही झालेली आहे. सोशल मीडियावर अलीकडे लहान मुलांवर कुत्र्याच्या घटना सातत्याने दिसून येत आहेत. सध्या सोशल मीडिया एक्सवरील @Jyoti_karki_या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT