ही धावती कार पाहा.. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या सर्विस रोडवर या धावत्या कारच्या डिक्कीतून अचानक हे काय बाहेर आलंय... नीट नीरखून पाहा.. अरे बापरे.. पाहिलंत.. हा आहे माणसाचा हात... होय या कारच्या डिक्कीतून बाहेर आलेला हात एका व्यक्तीचा आहे.. आता या व्हिडीओतील संभाषण पुर्ण ऐका...
तुम्ही पाहिलं आणि ऐकलं असेल.. नवी मुंबईच्या रस्त्यावर धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीतून हा एका व्यक्तीचा हात बाहेर आला आणि या व्यक्तीचं अपहरण झालंय. की त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह या कारमधून घेऊन जाण्यात येतोय असा प्रश्न हा व्हिडीओ पाहणाऱ्या आणि ही धावती कार पाहणाऱ्या अनेकांना पडला.. तुमच्याही काळजाचा ठोका चुकला असेल.. तुम्हालाही वाटलं असेल की ही लोकं कोण आहेत.. ही कार कोणाची.. पोलिस काय करत होते.. तर मग ऐका पोलिस काय याप्रकरणासंदर्भात काय सांगतायेत..
कारच्या डिक्कीतून बाहेर आलेला हा हात हा अपहरण किंवा मृतदेहाचा नसून केवळ रिल्स बनवण्याच्या नादात जाणूनबुजून केलंलं कांड आहे. पोलिसांनी गाडीच्या नंबरच्या आधारे गाडीचा शोध घेतला. त्यानंतर ती कार ताब्यात घेऊन कारमालक, चालक आणि सहकाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा फोल्डेबल लॅपटॉप विक्री बाबतच्या प्रमोशनसाठी हा रील बनवल्याचं स्पष्ट झालं. पण असे व्हिडीओ तयार करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली
रिल्सच्या नादात हे रिल्सस्टार वेडेचाळे करतांना आपण पाहिलेत. पण जर तुम्ही देखिल रिल्स बनवून फेमस होण्याच्या नादात असे रिल्स बनवत असाल तर तुमच्यावर देखिल कारवाई होईल ऐवढं मात्र खरं त्यामुळे मनोरंजनासाठी रिल्स बघा बनवा.. पण याच रिल्स तुम्हाला गजाआड तर पाठवणार नाही ना याची ही काळजी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.