एसटी बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही; पठ्ठ्यानं असा जुगाड केला की हसावं की रडावं कळेना! VIDEO Viral  meta ai
व्हायरल न्यूज

एसटी बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही; पठ्ठ्यानं असा जुगाड केला की हसावं की रडावं कळेना! VIDEO Viral

एसटीमध्ये सगळ्या सीट फुल्ल होत्या. त्यामुळे अनेक प्रवासी उभे होते. पण एका पठ्ठ्याने थेट लगेज रॅकमध्येच मस्त ताणून दिली. त्याच्या या कृतीनं हसावं की रडावं काही कळेना...पण हे सगळं बघून कंडक्टरचा पारा चढला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.

Saam Tv

एसटी बसमध्ये बसायला जागा नसते म्हणून कधी-कधी एखादा बिच्चारा भलामाणूस ताटकळत उभा असतो. कोणीतरी उठेल आणि आपल्याला बसायला जागा मिळेल या आशेवर त्याची त्या सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या प्रत्येक हालचालीकडं नजर असते. पण एका पठ्ठ्यानं बसायला जागा नाही म्हणून भलताच जुगाड केला. तो बसमध्ये बॅग आणि वस्तू ठेवण्याच्या रेकमध्येच मस्त ताणून दिली. प्रवाशाची 'मस्ती' बघून कंडक्टरचा पारा चढला खरा, पण इतर प्रवाशांना हसावं की रडावं हेच कळेना झालं होतं. नंदुरबार जिल्ह्यातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एका लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा हा प्रताप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसटी बसमध्ये गर्दी होती. बस फुल भरली होती. इतर प्रवासी उभे होते. सीट रिकामी होऊन बसायला जागा मिळेल, या आशेत उभा असलेला प्रत्येक प्रवासी होता. पण एक महाशय लय भारी. त्यांना काही वाट बघणं जमलं नाही. बसायला मिळेल तेव्हा मिळेल, पण कुठेतरी बस्तान मांडू, हेच त्याचं धोरण असावं. त्यानं आयडीयाची कल्पना लढवली. सीटच्या वरच्या बाजूला बॅग आणि प्रवाशांच्या वस्तू ठेवण्यासाठी असलेल्या रेकमध्येच त्यानं हातपाय पसरले आणि मस्त ताणून दिली.

हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच एसटीमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी त्या माणसाला बघून दचकले. तर काही जणांना हसूच आवरले नाही. झालेला गोंधळ कंडक्टरच्या लक्षात आला. त्याने तातडीने बस थांबवली. त्या माणसाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण तो माणूस आपली ऐसपैस जागा सोडायलाच तयार नव्हता. शेवटी कंडक्टरने आपला अहिराणी इंगा दाखवला. खाली उतर नाहीतर गाडी थेट पोलीस ठाण्यात नेतो असा सज्जड दम दिला. तेव्हा कुठे माणूस एकदाचा खाली आला. या पठ्ठ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला.

Back Itching: तुमच्या पाठीला सतत खाज येतेय? काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नागपूर जबलपूर हायवेवर ट्रेलरची दुचाकीला धडक, महिला ठार

Crime : धक्कादायक! अज्ञात हल्लेखोरांनी नेत्याला संपवलं, राजकारणात खळबळ; परिसरात प्रचंड तणाव

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

SCROLL FOR NEXT