ऐकलात...काळ्या बुरशीचा कांदा खाल्ल्यामुळे लिव्हर, किडनीला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...हा दावा अत्यंत गंभीर आहे...अनेकांच्या घरी घरात एखादा बुरशीवाला कांदा पाहायला मिळतो...त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे...सगळ्यांचा आरोग्याचा हा प्रश्न असल्याने आम्ही पडताळणी सुरू केली...
काळी बुरशी असलेला कांदा खाल्ल्यास लिव्हर आणि किडनीवर परिणाम होतो असा दावा केलाय...'ब्लॅक मोल्ड' नावाची बुरशी आरोग्यास घातक असल्याचा दावा केल्याने भीती निर्माण झालीय...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने खरंच कांद्यावरील बुरशी घातक आहे का...? हे तज्ज्ञांकडून जाणून घेतलं...
कांद्यावरील काळी बुरशी जीवाला घातक नाही
बुरशीयुक्त कांदा खाल्ल्यास वृद्ध, मुलांना त्रास होऊ शकतो
कांदा धुऊन वापरल्यास कोणताही परिणाम होत नाही
काळ्या बुरशीमुळे कांद्याची गुणवत्ता खालावते
तज्ज्ञांच्या मते ही बुरशी थेट जीवघेणी नसली, तरीही कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी हा कांदा आजारपणाचे कारण ठरू शकतो, असा इशारा गॅस्ट्रो तज्ज्ञांनी दिलाय...
लहान मुले, वृद्ध, आणि कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्णांना त्रास होऊ शकतो...उलट्या, जुलाब, मळमळ, त्वचेवर खाज सुटणे असा त्रास जाणवतो...त्यामुळे कांदा वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा...बाधित कांदा साठवलेल्या कांद्यापासून वेगळा करा...त्यामुळे आमच्या बुरशीयुक्त कांदा खाल्ल्यास किडनी, लिव्हरला धोका निर्माण होतो हा दावा असत्य ठरलाय...अ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.