Saam Tv
व्हायरल न्यूज

डान्सचा जलवा! 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर नणंद-भावजयच्या ठसकेबाज स्टेप्स; VIDEO व्हायरल

Two Women Dance Video: सोशल मीडियावर सध्या एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा डान्स पाहून प्रत्येकजण असाच डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही हा डान्स व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Trending Dance Video: हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओज व्हायरल होत असतात. कधी मैत्रिणींचा डान्स असतो तर कधी आई-मुलीचा. मात्र, सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे नणंद आणि भावजयच्या जोडीचा भन्नाट डान्स. 'एक नंबर तुझी कंबर' या मराठमोळ्या गाण्यावर या दोघींनी असा काही ताल धरलाय की, पाहणाऱ्यांच्या नुसत्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

या गाण्याचं स्पेशालिटी म्हणजे त्याचा बीट आणि ऊर्जा. लग्नसराईत असो हळदी समारंभात किंवा कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमात हे गाणं लागलं की मंडळी नाचायला उठतातच. आणि यावेळीही तसंच झालंय. नणंद आणि भावजय या दोघी घराबाहेर आल्या आणि 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर त्यांनी जो डान्स (Dance) सादर केला, त्याने सर्वांची मने जिंकलीच शिवाय नेटकर्‍यांचंही लक्ष वेधून घेतलं.

या व्हिडिओमध्ये दोघीहीनी साडी नेसली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, स्मितहास्य आणि तालबद्ध हालचाली यामुळे हा डान्स अजूनच उठून दिसतो. त्यांच्या सादरीकरणात एकमेकांप्रती असलेला सुसंवाद, ट्यूनिंग आणि आनंद स्पष्टपणे जाणवतो. सहसा नणंद-भावजयचं नातं थोडंसं साशंकतेनं पाहिलं जातं, पण या व्हिडिओने हे नातं किती सुंदर असू शकतं याचा आदर्श दाखवून दिलाय.

कौतुकांचा वर्षाव

हा डान्स व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''सहसा आता असं पाहण्यासाठी मिळत नाही, दोघींनी नातं असंच ठेवा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुपच छान डान्स केला आहे'' तर बऱ्याच जणांनी अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT