Mysterious lights spotted in the Indian sky spark fear; viral video’s truth finally revealed saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: आकाशातून घोंगावतंय संकट? रहस्यमय लाईट्समुळे दहशत; व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

Mysterious Lights In India Sky: भारतावर आकाशातून संकट घोंगावतंय असा दावा करण्यात आलाय.तसा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय.आकाशात तेजस्वी प्रकाश होताना दिसतोय.पण, आकाशात दिसतंय ते नक्की काय आहे. याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • भारताच्या आकाशात रहस्यमय लाईट्स दिसल्याने दहशत पसरली.

  • फॅक्ट चेकनंतर हा प्रकाश स्पेस डेब्री किंवा उल्कापाताचा असल्याचं समोर आलं.

  • दिल्लीसह परिसरात आकाशात लघुग्रह दिसला

आकाशात दिसणाऱ्या या रहस्यमयी लाईट्समुळे एकच खळबळ उडालीय.अचानक तारांचा स्फोट होतो त्याप्रमाणेच हा तेजस्वी प्रकाश दिसल्याने सगळेच हैराण झालेयत.आकाशात नक्की दिसतंय तरी काय? आकाशात तेजस्वी प्रकाश कशामुळे दिसतोय.यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

हा व्हिडिओ पाहून आकाशात तारा तुटल्याचा दावा करण्यात आलाय. तर काहींनी म्हटलंय आकाशातून देशावर संकट घोंगावतंय,असे व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत असल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आकाशात तेजस्वी प्रकाश कसला आहे? आकाशात खरंच तारांचं घर्षण झालंय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या प्रश्नांचं निरासन करण्यासाठी तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

देशावर आकाशातून संकट आलेलं नाही

दिल्लीसह परिसरात आकाशात लघुग्रह दिसला

लघुग्रह किंवा धुमकेतू सूर्याकडे जात असतो

पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर घासला गेला

वातावरणात ऑक्सिजन असल्याने पेट घेतो

हा दिसलेला लघुग्रह होता. त्यामुळे आमच्या पडताळणीत दिल्लीतून आकाशातून संकट घोंगावत असल्याचा दावा असत्य ठरला,असे मेसेज व्हायरल होत असतील तर त्याची पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohanlal Films : भूल भुलैया ते दृश्यम, मोहनलाल यांचे कोणते चित्रपट हिंदीत झाले रिमेक?

Food Safety: 'हे' पदार्थ कधीही वारंवार गरम करून खाऊ नका, अन्यथा होतील गंभीर परिणाम

पुण्यात ठाकरे गटाला धक्का? बडा नेता अजित पवारांसोबत जाणार? नेत्याची पत्नी दादांना भेटणार

Maharashtra Politics : आमदार नसतानाही २० कोटी मिळलेत, शिंदेंच्या शिवसेना नेत्याचे वादग्रस्त विधान

Ideal weight chart: उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? चार्ट वाचून पाहा तुम्ही लठ्ठ तर नाही ना

SCROLL FOR NEXT