ऐकलंत...आता 2 मिनिटांत तुटलेलं हाड जोडता येणार आहे...होय, असा नवीन बोन ग्लू आल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे फक्त 2 मिनिटांत तुटलेलं हाड जोडणं शक्य होणाराय...बोन ग्लूने जर हाड जोडता येत असेल तर आनंदाची बातमी आहे...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...
या व्हिडिओत बघा, हाड मोडल्यानंतर हे बोन ग्लू कसं काम करतं...एवढ्या लवकर मोडलेलं हाड जोडता आलं तर खूप चांगलीच प्रगती आहे...यामुळे वेळही वाचेल आणि पैशांची बचत होईल...त्याचसोबत तब्येतही लवकर बरी होण्यास मदत होईल...मात्र, या व्हिडिओत जसं सांगितलंय ते खरं आहे का...? आपल्या भारतातही बोन ग्लू वापरून हाड जोडली जातात का...? व्हिडिओत ही सेवा चीनमध्ये असल्याचा दावा केलाय...मात्र, भारतातही अशी टेक्नोलॉजी आलीय का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने एक्सपर्टची भेट घेतली...आणि बोन ग्लूने हाड जोडणं शक्य आहे का...? याची आम्ही अधिक माहिती मिळवली...
चीनी शास्त्रज्ञांनी बोन ग्लू तयार केलाय
2 ते 3 मिनिटांत तुटलेली हाडं जोडणं शक्य
200 किलोपर्यंतचं वजन सहन करू शकेल
बोन ग्लू 6 महिन्यांत अवयवाशी एकरुप होईल
भारतात या तंत्रज्ञानाला मान्यता नाही
चीनमध्ये आतापर्यंत 150 रुग्णांवर यशस्वी चाचणी करण्यात आलीय असाही दावा केलाय...आता हे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेत एक अद्भुत बदल घडवून आणेल...आणि भविष्यात हाडांच्या फ्रॅक्चर उपचारांमध्ये क्रांती घडेल...त्यामुळे आमच्या पडताळणीत 2 मिनिटांत हाडं जोडणारा बोन ग्लू आल्याचा दावा सत्य ठरलाय...मात्र, हे बोन ग्लू चीनमध्येच आहेत...भारतात या तंत्रज्ञानाला मान्यता मिळालेली नाही..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.