Shruti Vilas Kadam
सफेद तीळ, गूळ, तूप, वेलची पूड आणि आवडीनुसार काजू-बदाम.
कढईत सफेद तीळ मंद आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या आणि थंड होऊ द्या.
त्याच कढईत थोडे तूप घालून गूळ मंद आचेवर वितळवा, गूळ पूर्ण मऊ झाला की गॅस बंद करा.
वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ घालून नीट मिसळा.
मिश्रणात वेलची पूड आणि बारीक चिरलेला सुका मेवा घालून चांगले ढवळा.
मिश्रण कोमट असतानाच हाताला थोडे तूप लावून लाडू वळा.
लाडू पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा; रोज १–२ लाडू खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढवते, सांधेदुखी कमी होते, पचनशक्ती सुधारते,शरीराला उष्णता मिळते, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते.