ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाथरूम मधील टाईल्स जर सफेद असतील तर त्या लवकर पिवळ्या पडून घाण दिसू लागतात. तसेच पाय सुध्दा घसरु लागतात.
टॉयलेट साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे टॉयलेट क्लिनर बाजारात उपलब्ध आहेत. पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही टाईल्स चमकवू शकता.
तर जाणून घ्या बाथरूम मधील टाईल्स चमकविण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत.
सर्वात आधी पाण्यात बेकिंग सोडा टाकून एक मिश्रण बनवून घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करा.
आता या तयार केलेल्या मिश्रणाला लादिवर टाका आणि १५ मिनिटे तसेच ठेवून द्या.
तुम्ही आता ब्रशने किंवा स्क्रबरच्या मदतीने टाईल्सला घासून साफ करुन घ्या.
सफेद कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा आला सुध्दा टाईल्सला साफ करण्यास मदत करतो.
आला लादिवर ५ मिनिटे टाकून ५ मिनिटांनंतर टाईल्सला घासून घेवून साफ करा.
तुमच्या घरात जर व्हिनेगर असेल तर, व्हिनेगरमध्ये लिंबाचा रस मिक्स करुन लादिवर टाका.
व्हिनेगर टाईल्स वरील मळ काढून नवीन चमकदार बनवण्यास मदत करतो.