Mumbai Traffic Police Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

Girgaon Chowpatty Viral Video: गिरगाव चौपाटीवर वाहतूक पोलिसाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. दुचाकी पाडल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला.

Manasvi Choudhary

वाहतुकीच्या नियमाचं पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी या नियमाचं उल्लंघन होताना दिसते. नियम मोडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र नुकतच गिरगाव चौपाटी येथे पोलिसाने केलेल्या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सर्वत्रच गोंधळ उडाला आहे. पोलिसच जर असे कृत्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाचे विसर्जन झाले. यावेळी गिरगाव चौपाटीवर भक्ताची मोठी गर्दी जमली. लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सर्वचजण आले होते. दरम्यान यावेळी गर्दीच्या ठिकाणी पार्किंग झोन नसलेल्या ठिकाणी अनेकांनी दुचाकी उभ्या केल्या. याचदरम्यान वाहतूक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आह सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

वाहतूक पोलिसाने केली कारवाई

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गिरगाव चौपाटीचा परिसरात नागरिकांनी दुचाकी उभ्या केल्या आहेत. माहितीनुसार, नो पार्किंग झोनमध्ये या दुचाकी उभ्या केल्याने वाहतूक पोलिसाने कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई चुकीची आहे. पोलिसांने थेट नागरिकांच्या दुचाकी पाडल्या आहेत. जवळपास एकाच रांगेत उभ्या असलेल्या ७ ते ८ दुचाकी या पोलिसाने पाडल्या ज्यामुळे मोठा नुकसान झालं आहे.

पोलिसाच्या चुकीच्या कारवाईमुळे संपताप

वाहतुक नियमानुसार दुचाकी पार्किंग असलेल्या ठिकाणी उभी करणे महत्वाचे आहे. मात्र कोणी जर नो पार्किंग झोनमध्य उभी केली असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करत दंड आकारला जातो. पण इथे पोलिसच जर चुकीचं कृत्य करत असतील तर अशा पोलिसांना कोण बोलणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT