Viral Dance video: Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Dance video: मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर तरुणी अचानक नाचू लागली; डान्स पाहून काका दचकला, व्हिडिओ पाहून म्हणाल...

Viral Dance video: एका तरुणीने चक्क मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर अजब डान्स केला आहे. या तरुणीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Viral Dance video:

तुम्ही लग्नाच्या वरातीमधील लोकांचा डान्स अनेकदा पाहिला असेल. या वरातीमधील लोक, तरुण-तरुणींचा फ्री-स्टाईल, नागीण डान्स पाहून पोट धरून हसले असाल. या लग्नाच्या वरातीत नाचणं तशी साधारण बाब आहे. मात्र, एका तरुणीने चक्क मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर अजब डान्स केला आहे. या तरुणीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत तुम्ही बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला असेल. मात्र, रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून काही जण नाचण्याचं कौतुक करत आहे. तर काही जण या तरुणीला ट्रोल करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी रेल्वे स्टेशनवर उभी होती. ती अचानक नाचायला सुरुवात करते. तिचा अजब डान्स पाहून बाजूने जाणारा एका काका देखील दचकला. तरुणीचा डान्स नेटकऱ्यांनाही काही पचनी पडला नाही. तरुणीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

अजब डान्स पाहून काका घाबरला...

सीमा कनोजिया असं नाव असलेल्या या तरुणीने तिचा हा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केला आहे. तर दोन हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या डान्सच्या अजब व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अफलातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'मी सरकारला विनंती करतो की, यांचा एक वेगळा देश बनवा. त्यानंतर त्या देशात इंटरनेट बंद करून टाका'.

तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, काका घाबरले'. 'डान्स खूपच चांगला केला, आता पुन्हा करू नका , अशीही एकाने कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT