Marine Drive Viral Video  Mumbai Viral Video - Saam TV
व्हायरल न्यूज

Mumbai Viral Video: मरिन ड्राईव्हवर 'हिरोगिरी' करायला गेला अन् फजिती झाली! हौशी तरुणाला पोलिसांनी घडवली अद्दल; VIDEO

Mumbai Viral Video: धोकादायक ठिकाणी रिल काढणे, सेल्फी काढणे असे प्रकार टाळण्याच्या सुचना नेहमीच दिल्या जातात. मात्र काही तरुण - तरुणी अशा सुचनांकडे दुर्लक्ष करुन भलतं धाडसं करण्याचा प्रयत्न करतात.

Gangappa Pujari

Marine Drive Viral Video:

सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. बऱ्याचदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. त्यामुळेच पोलिसांकडून नेहमी अशा ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र तरीही काही हौशी मंडळी अतिउत्साहात नको तेच करतात. सध्या सोशल मीडियावर मरिन ड्राईव्हवरील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाण्यापासून दूर रहा, धोकादायक ठिकाणी रिल काढणे, सेल्फी काढणे असे प्रकार टाळण्याच्या सुचना नेहमीच दिल्या जातात. मात्र काही तरुण - तरुणी अशा सुचनांकडे दुर्लक्ष करुन भलतं धाडसं करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा याच अतिउत्साहामुळे मोठ्या दुर्घटनाही घडल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबईच्या मरिन ड्राईव्हवरील अशाच एका हौशी तरुणाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

हा तरुण मरिन ड्राईव्हवरील उंच लाटांचा आनंद घेत असतानाच धोकादायक ठिकाणी उभे राहून रिल शूट करताना दिसत आहे. त्याचा हा प्रताप पाहून मुंबई पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मरिन ड्राईव्हवर एक तरुण उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी भलतेच धाडस करताना दिसत आहे. हा तरुण कट्ट्यावरुन खाली उतरुन थेट दगडांवर पोहोचला आहे. त्याचा हा प्रताप पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला पकडून चांगली शिक्षा दिल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलिसांनी या तरुणाला सर्वांसमोर पुशअप्स काढण्यास सांगितले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच काही जणांनी हा तरुण पुन्हा तिकडे फिरायला जाणार नाही.. अशा मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT