Kolkata News: लाडक्या मांजरीला वाचवायला गेली, जीव गमावला; ८ व्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

Kolkata Woman Death News : पाळीव मांजरीला वाचवण्याच्या नादात एका ३३ वर्षीय महिलेने आपला जीव गमावला. आठव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. कोलकात्यात ही दुर्दैवी घटना घडली.
Kolkata Woman Death News
Kolkata Woman Death NewsSaam Digital
Published On

Kolkata Woman Death News

पाळीव मांजरीला वाचवण्याच्या नादात एका ३३ वर्षीय महिलेने आपला जीव गमावला. आठव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. कोलकात्यात ही दुर्दैवी घटना घडली.

इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर मांजर अडकली होती. तिला वाचवण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. त्याचवेळी आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच ही महिला या इमारतीत राहायला आली होती. कोलकाताच्या टॉलीजंग परिसरात घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंजना दास असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolkata Woman Death News
Hingoli Farmer Death News | वीज कोसळून मरण पावलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह रुग्णालयात ताटकळत का ठेवला?

सोमवारी सकाळी आठच्या सुमारास लेव्ह अॅव्हेन्यू रोडवर असलेल्या सोसायटीत ही घटना घडली. सोसायटीतील लोकांना जोराचा आवाज आला. नेमकं काय झालं हे बघण्यासाठी इमारतीतील रहिवाशांनी धाव घेतली. अंजना दास या जमिनीवर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अंजना ज्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या, त्या मांजरीला इमारतीतील लोकांनी सुखरुप बाहेर काढले आहे. आजूबाजूच्या लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. अंजना रविवारी संध्याकाळपासून त्यांच्या पाळीव मांजरीच्या शोधात होत्या. मांजर ताडपत्रीवर अडकल्याचे त्यांना दिसले. मांजरीला बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत असताना पाय घसरुन त्या खाली पडल्या.

याच इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशानं सांगितलं की, अंजना या मांजरीला वाचवण्यासाठी ताडपत्रीजवळ गेल्या. त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि खाली पडल्या. दीड महिन्यापूर्वी मांजराला घरी आणलं होतं. त्या मांजरीनं तीन पिलांना जन्म दिला होता. ही मांजर अचानक गायब झाल्यानं अंजना तिचा शोध घेत होत्या. मांजर ताडपत्रीवर अडकल्याचे सोमवारी त्यांच्या लक्षात आले. तिला वाचवण्याच्या धडपडीत अंजना यांनी आपला जीव गमावला.

अंजना या कुटुंबीयांसह भाड्याच्या घरात राहायला आल्या होत्या. त्यांना इथं येऊन महिना झाला होता, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. ही घटना एक अपघात आहे असं प्रथमदर्शनी दिसतं. अंजना यांचे पती बाहेरगावी राहतात. त्यांना या घटनेची माहिती दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Kolkata Woman Death News
Fathima Beevi Death News: सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन, केरळमध्ये घेतला अखेरचा श्वास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com