गौरव नावाच्या तरुणाला कचराकुंडी शेजारी एक मांजरीचं पिल्लू ओरडताना दिसलं. गौरवचं मन पिल्लाला पाहून राहावलं नाही...
गौरव पिल्लासाठी तासभर तिथंच थांबला, त्याने पिल्लाच्या आईची वाट पाहिली. मात्र, ती काही आली नाही. त्याने पिल्लाला थेट घरी नेलं.
गौरवने पिल्लाला दूधाच्या बॉटलने दूध पाजलं. पिल्लाची काळजी घेतली.
स्वतःची नोकरी, लहान भावाचं कॉलेज, आई -वडिलांच्या नोकरीमुळे वेळ देता येणार नाही म्हणून त्यानं इन्स्टाग्रामवर 'मुंबई कॅट अॅडोबशन्स'वर एक मॅसेज टाकला.
दोन दिवसांनी कल्याणच्या एका कुटुंबाला संपर्क केला. त्यानंतर ते मांजरीचं लहान पिल्लू दत्तक दिलं.
कल्याणमधील कुटुंबाने घरी नेऊन त्याचं रितसर औक्षण करून गृहप्रवेश केला.