Mumbai Local Train Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Train Viral Video: आई कुठे काय करते? प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमध्ये बाळाला ठेवलं सुरक्षित, डोळ्यांत टचकन पाणी येईल...

Mumbai Local Train Viral Video: गर्दीत लहान बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वेळी प्रवास करणे फार अवघड असते. लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना अक्षरश: एका पायावर उभं राहून प्रवास करावा लागतो. याच गर्दीत लहान मुलांना घेऊन प्रवास करणे फार जिकरीचं काम आहे. अशाच गर्दीत लहान बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील ट्रेनच्या गर्दीच्या वेळी मुंबईकर उभं राहूनच प्रवास करत असतो. लोकल ट्रेनमधील 'जनरल' डब्बा किंवा महिलांच्या डब्यातही फारशी परिस्थिती काही वेगळी नसते. मुंबईत लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यातही फार गर्दी असते.

अनेक महिला रोज कामाला जाताना उभे राहूनच प्रवास करत असतात. प्रवास करताना महिला डब्यात कडाक्याचे भांडणे, हाणामारीच्याही घटना घडली आहे.

याचदरम्यान, लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यामधील एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोकल ट्रेन प्रवाशांनी खच्चून भरलेली दिसत आहे. हा महिलांचा डब्बा आहे. या ट्रेनमध्ये महिला गर्दीत उभ्या राहून प्रवास करताना दिसत आहे. तर काही महिला आसनावर बसलेल्या आहेत. त्यातील एक महिला तिच्या बाळाला घेऊन प्रवास करत आहे.

या ट्रेनमध्ये बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला देखील बसायला जागा मिळाली नाही. त्यात ही महिला बाळाला घेऊन उभं राहूनच प्रवास करत आहे. अशावेळी बाळाला तिने ट्रेनमधील रॅकवर ठेवलं आहे. हे बाळ देखील शांतपणे बसलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला आहे. लोकल ट्रेन गर्ल नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे . 'किती ती गर्दी, मुंबईची माणसे खूप मेहनती असतात. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणे म्हणजे दिव्य', अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे .

'मुंबई उपनगरात राहणाऱ्या महिला खरंच देशात सर्वात संघर्ष करतात. घराचं सर्व करून ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करा... पुन्हा घरी जाऊन सर्व गोष्टी करा. मुलांचा अभ्यास घ्या. सासूचे टोमणे खा... हे असं आयुष्य असतं', असंही दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT