Success Story : ती आली, तिने पाहिलं, तिने सारंच जिंकलं...! जिद्दीच्या जोरावर चहावाल्याची बायको बनली मुंबई पोलीस

Mumbai police success story: बीडमध्ये एका चहावाल्याच्या बायकोने मिळवलेल्या यशाची जोरदार चर्चा होत आहे.
Mumbai police success story
Mumbai police success storySaam tv

Mumbai Police Success Story: चहावाल्याची कमाई आणि व्यवसायात यशस्वी झाल्याच्या कथा, बातम्या तुमच्या वाचनात अनेदा आल्या असतील. मात्र, बीडमध्ये एका चहावाल्याच्या बायकोने मिळवलेल्या यशाची जोरदार चर्चा होत आहे. बीडमधील चहावाल्याची बायकोजिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस झाली आहे. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बीडमधील केज शहरात टपरी चालवून कुटुंबाचा उदारनिर्वाह करणाऱ्या चहावाल्याच्या बायकोने स्वत:ला सिद्ध करत मुंबई पोलीस झाली आहे. तिने मुंबई पोलीस दलात तिची शिपाई आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली आहे.

Mumbai police success story
Yashasvi Jaiswal Success Story : जयस्वालच्या यशस्वी खेळीचं रहस्य उघड! मुंबईपासून ५० किमी दूर दडलंय तरी काय?

बीडच्या केज येथील पोलिस ठाण्यासमोर महामार्गालगत बालाजी पाचपिंडे यांची चहाची टपरी आहे. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवासी आहेत. उपजीविकेच्या शोधात त्यांनी तीन वर्षांपूर्वी केजमध्ये आले होते. याच शहरात केजमध्ये एक लहानशी चहाची टपरी सुरू केली. यातून त्यांना दिवसाकाठी 600 ते 1 हजार रुपये मिळतात. या पैशांतून त्यांना कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. राहायला स्वतःचे घर देखील नाही.

बालाजी यांची पत्नी माधवी पाचपिंडे- वाघचौरे यांनी विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन कुटुंबाला हातभार लावला. यासोबत त्यांनी पोलीस भरतीची तयारी देखील सुरु ठेवली. त्यांनी लेखी परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयांचाही अभ्यास केला. यावेळी माधवी यांनी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले . त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना मोठं यश मिळालं आहे.

Mumbai police success story
Sara Tendulkar Education: सचिनची लाडकी लेक साराचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून व्हाल थक्क

माधवी यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्यानंतर केज पोलीस शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी या पाचपिंडे दांपत्याचा पोलीस ठाण्यात बोलावून सत्कार केला. दरम्यान आपण आपल्या जमादार असणाऱ्या नंनदाकडे पाहून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन पोलीस बनले आहे, अशी प्रतिक्रिया माधवी पाचपिंडे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com