Mumbai Local Train Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Train Viral Video: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणी सीटवर बसून नाचू लागली; आजूबाजूचे प्रवासी पाहून झाले चकीत

Mumbai Local Train Viral Video: लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसून डान्स करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेचा डान्स अनेक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: मुंबईकरांची लाईफलाईन म्हटलं तर मुंबईची लोकलची ट्रेन. नोकरीनिमित्त अनेक प्रवासी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. हीच लोकल ट्रेन प्रवाशांच्या गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. या मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. असाच लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसून डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तरुणीचा डान्स अनेक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनेकवेळी प्रवाशांना बसायला देखील जागा नसते. अनेक जण उभे राहूनच प्रवास करतात. लोकल ट्रेनमधील 'जनरल' डब्बा किंवा महिलांच्या डब्यातही प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात सारखीच असते. अशा ट्रेनमध्ये बहुतांश प्रवासी आपापल्या धुंदीत मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेले असतात.

लोकलमध्ये गर्दीमुळे अनेकवेळा जोरदार भांडणे देखील पाहायला मिळतात. या लोकल ट्रेनमधील प्रवाशांचे धक्का लागला म्हणून हाणामारीच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

याच लोकल ट्रेनमध्ये अनेकदा सकारात्मक बाबी देखील घडत असतात. काही महिन्यांपूर्वी तरुणांचा गितार वाजवत गाणे गातानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता एका तरुणीचा ट्रेनमध्ये नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...आणि तरुणी नाचू लागली

लोकल ट्रेनमध्ये तरुणी सीटवर बसली होती. अचानक ही तरुणी सीटवर बसूनच नाचू लागली. तिचा डान्स पाहून आजूबाजूचे प्रवासी चकीत झाले. सीटवर बसलेल्या सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेले. मात्र, महिला मात्र प्रवाशांना न लाजता नाचायची काही थांबली नाही.

या तरुणीचं नाव सीमा कनोजिया असून ती व्लॉगर आहे. सीमा अनेक कॉमेडी व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांना हसवत असते. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा नेटकरी सीमाला ट्रोल करताना दिसतात. सीमाचा हा व्हिडिओ पाहून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर एका युजरने कमेंट्स केली आहे की, अरे देवा! मी झोपण्यापूर्वी हिचा व्हिडिओ पाहिला, आता मला झोप येईल का?, असं म्हणत ट्रोल केलंय. तर 'लाल शर्ट घातलेल्या प्रवासी डान्स पाहून पूर्णपणे चकीत झाला आहे, त्याचा चेहरा बघा...!, अशी एक कमेंट्स दुसऱ्या नेटकऱ्याने केली आहे.

पोलिसांच्या गणवेशाला दोरी का असते? 99% लोकांना नसेल माहिती

Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशनची भारतात धमाकेदार एंट्री, किंमत जास्त पण जबरदस्त फीचर्स

Pune: बायको गावाकडे, मुलं शाळेत; वाहतूक पोलिसाने राहत्या घरी संपवलं आयुष्य, पुण्यात खळबळ

Agriculture News: जमिनीची वाटणी झाल्यानंतर सामूहिक 7/12 च्या उताऱ्यातून वेगळा उतारा कसा काढायचा? जाणून घ्या प्रोसेस

Shahrukh Khan Net Worth: बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानची एकून नेटवर्थ किती? आकडा वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT