भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसाढवळ्या कुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी होत आहेत. या घटनांचे आजवर अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. मात्र अद्यापही कुत्र्यांची भीती संपूर्ण संपलेली नाही. सध्या देखील तेलंगनामधील अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
हा व्हिडिओ तेलंगनाच्या करीमनगरमधील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आपल्या बाळाला कुशीत घेऊन चालली आहे. बाळाला सोबत घेऊन जाताना त्या गल्लीत काही भटके कुत्रे महिलेच्या मागे मागे येऊ लागले. त्यानंतर या कुत्र्यांनी थेट महिलेवर आणि तिच्या बाळावर हल्ला करण्यास सुरुवात केली.
ही महिला आपल्या बाळाला पुढे पळत सुटली. तिला पळताना पाहून कुत्रेही तिच्या मागे पळू लागले. महिलेने रस्त्यात थांबून कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे काही तेथून गेले नाही. महिला आणखी घाबरली आणि बाळाला घेऊन पळू लागली.
येथे पळताना या महिलेचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. बाळाला घेऊन खाली पडल्यावर या महिलेने बाळ घट्ट धरून ठेवलं. ती खाली पडताच अन्य कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला आणि थोडी जखमी झाली. मात्र मोठ्या हिंमतीने तिने आपल्या बाळाला वाचवत कुत्र्यांना तेथून पळवून लावलं आहे.
आई ही आईच असते. तिची जागा अन्य कुणीही घेऊ शकत नाही. आपलं मुल संकटात असताना एक आई जे काही करू शकते ते अन्य कुणीही करू शकत नाही. याचीची प्रचिती घडवणारा हा व्हिडिओ आहे. या आधी देखील सोशल मीडियावर एक महिला पहाटे मॉर्निंग बॉकसाठी बाहेर पडली होती तेव्हा तिच्यावर कु्त्र्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी या महिलेने सुद्धा मोठ्या हिंमतीने कुत्र्यांना पळवून लावलं होतं.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.