Colour Changing Umbrella Saam tv
व्हायरल न्यूज

Colour Changing Umbrella: काय सांगता! ठाण्यात मिळतेय जादूई छत्री; पावसाचं पाणी पडताच बदलतोय रंग, पाहा व्हिडिओ

आपल्या छत्रीत काहीतरी युनीक आणि नावीन्य असावं असं सर्वांनाच वाटतं.

Ruchika Jadhav

Umbrella Shop in Thane: पावसाळा सुरु झाला की सगळीकडे छत्री खरेदीची लगबग सुरु होते. छत्री दुकानाबाहेर ग्राहकांची तुफान गर्दी जमा होते. स्वस्तात मस्त छत्री मिळावी असं सर्वांना वाटतं. बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत. महिलांसाठी पुरुषांसाठी अशा वेगवेगळ्या छत्र्या हव्या तशा घेता येतात. आपल्या छत्रीत काहीतरी युनीक आणि नावीन्य असावं असं सर्वांनाच वाटतं. (Latest Umbrella News)

छत्रीवर पाणी पडताच रंग बदलला

अशात सोशल मीडियावर एका भन्नाट जादुई छत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. बाजारात एक नवीन छत्री आली आहे. या छत्रीवर पाणी पडताच तिचा रंग बदलतो. आपली छत्री छान आणि सुंदर असावी असं अनेक मुलींना वाटतं. काही जण तर छत्रीवर खास नक्षी देखील बनवून घेतात. त्यामुळे अशा व्यक्तींना पाण्यात रंग बदलणारी छत्री फार आवडेल.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दुकानदार त्याच्या दुकानातील सर्व प्रकारच्या छत्री दाखवत आहेत. यातील एका छत्रीवर सफेद रंगात काही नक्षी दिसत आहे. त्यावर पाणी पडताच नक्षीचा रंग बदलतोय. व्हिडिओपाहून सगळेच ग्राहक थक्क झालेत.

कुठे मिळतेय छत्री

रंग बदलणारी छत्री (Umbrella) मिळवण्यासाठी तु्म्हाला ठाण्यात भेट द्यावी लागेल. ६० स्टॅनबर्थ, उथळसर बाका, कॅसल मिल जवळ, ठाणे (प) असा या दुकानाचा पत्ता आहे. यासह त्यांचे भिवंडी येथे देखील त्यांचे होलसेल दरात छत्रीचे दुकान आहे. या दुकानात तुम्हाला अनेक प्रकारच्या छत्री मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT