रिल्स बनवण्यासाठी ट्रेनखाली झोपला युवक, व्हिडिओ व्हायरल Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: रील्ससाठी काय पण... रेल्वे ट्रॅकवर मोबाइल घेऊन झोपला, वरून ट्रेन सुसाट गेली, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Viral: उन्नावमध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असताना ट्रेन त्याच्यावरून गेली, पण तो बचावला, आणि जीआरपीने त्याला अटक केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण जिवाशी खेळतात. काहींनी तर हद्दच ओलांडली आहे. लाइक्स, शेअर्स आणि व्ह्यूजसाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण वाढले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण रेल्वे ट्रॅकवर रील बनवत होता. रेल्वे ट्रॅकमध्ये तो झोपला. शूटिंगसाठी मोबाइल हातात घेतला होता. त्याचवेळी अख्खी ट्रेन त्याच्यावरून गेली. यात त्याचा जीवही जाऊ शकला असता. आश्चर्य म्हणजे यात त्या तरुणाला साधं खरचटलं सुद्धा नाही. सुदैवाने तो बचावला. मात्र, असे जीवघेणे स्टंट करणे चुकीचेच आहे, असे सांगतानाच नेटकऱ्यांनी संतापही व्यक्त केला आहे.

ही घटना कुसुंभी रेल्वे स्थानकाजवळ घडली. रणजित चौरसिया नावाच्या एका तरुणाने रेल्वे ट्रॅकमध्ये झोपून स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये तो शाहरुख खानच्या 'बादशाह' चित्रपटातील एका गाण्यावर रील बनवत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे विभागात खळबळ उडाली. रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या गंभीर प्रकाराची दखल घेत जीआरपी (Government Railway Police) ने तात्काळ कारवाई केली आणि संबंधित तरुणाला अटक केली.

जीआरपीचे निरीक्षक अरविंद पांडे यांनी सांगितले की, या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुणाविरुद्ध रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. भविष्यात जर कोणी रेल्वे ट्रॅकमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणांनी आपला जीव धोक्यात घालू नये. ही कारवाई अशा तरुणांसाठी वॉर्निंग आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकरणांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT