Viral Helicopter Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: अय्यो, कहरचं! कचरा टाकण्यासाठी धुरळा उडवत चक्क हेलिकॉप्टरने आला अन्... VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Helicopter Video: हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी आयुष्यात फक्त एवढं श्रीमंत व्हायचयं, अशा मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Viral Video:

सोशल मीडिया म्हणजे चमत्काराची दुनिया.. सोशल मीडियावर धक्कादायक, थक्क करणारे, कधी आश्चर्यचकित करणारे, चक्रावून टाकणारे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कचरा टाकण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमधून आल्याचे दिसतेय. काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घ्या सविस्तर.

सोशल मीडिया (Social Media) म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून नेटकरीही चक्रावून जातात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती घरातील कचरा फेकण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरमधून आल्याचे दिसत आहे.हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी आयुष्यात फक्त एवढं श्रीमंत व्हायचयं, अशा मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोकळ्या जागेत कचऱ्याचा डब्बा ठेवल्याचे दिसत आहे. अचानक या ठिकाणी एक हेलिकॉप्टर येते. या हेलिकॉप्टरमध्ये बसलेला व्यक्ती हातातील कचऱ्याची थैली त्या कचरा कुंडीत टाकतो आणि पुन्हा हेलिकॉप्टर उंच झेपावते. हा प्रकार पाहून नेटकरीही चक्रावून गेलेत.

हेलिकॉप्टरने कचरा टाकायला येणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती तरी किती असेल, अशा चर्चाही काही नेटकऱ्यांमध्ये रंगल्याचे कमेंटमध्ये दिसत आहे. तसेच देवाने फक्त एवढं श्रीमंत बनवावं अशा मजेशीर प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिल्यात. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT