Viral video pigeons apartmen saam t
व्हायरल न्यूज

Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

Viral video pigeons apartment: ३ वर्षांनी घरी परतलेल्या व्यक्तीला फ्लॅटमध्ये १०० पेक्षा जास्त कबूतरं आढळली. उघड्या खिडकीमुळे कबूतरांनी घरावर कब्जा केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये तीन वर्षांनी घरी परतलेल्या एका व्यक्तीला त्याच्या घराची अवस्था पाहून मोठा धक्का बसतो. रशियातील वोरकुटा शहरातील हा प्रकार असून घराची एक खिडकी उघडी राहिल्यामुळे कबूतरांनी त्याच्या संपूर्ण फ्लॅटवर कब्जा केला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते.

ही व्यक्ती कामानिमित्त सायबेरियात गेली होती. जवळपास तीन वर्षे तो घरापासून दूर होता. घाईगडबडीत त्याच्याकडून घरातील एक खिडकी बंद करायची राहून गेली. याच छोट्या चुकीचा मोठा परिणाम झाला. उघड्या खिडकीतून कबूतरांनी घरात प्रवेश केला आणि हळूहळू संपूर्ण फ्लॅटला आपलं घर बनवलंय.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कबूतरं दिसतायत. घरात जवळपास १०० पेक्षा जास्त कबुतरं बसलेली होती. त्यांनी घरातच घरटी तयार केली होती. फर्निचर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणात घाण साचलेली होती. घराचा ताबाच कबूतरांनी घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यासारखं दिसतंय.

हा व्हिडिओ @BrianMcDonaldIE या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सने यावर आश्चर्य व्यक्त केलंय. काहींनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, 'हे पाहून विश्वास बसत नाही,' तर काहींनी याला 'त्या व्यक्तीची चूक' असल्याचं म्हटलंय.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पाडव्याला मुंबई-पुण्यात सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण, वाचा 22k,24k गोल्डचे ताजे दर

Ashok Kharat : कॅप्टन खरातला राजकीय अभय? रूपाली ठोंबरे यांनी बड्या नेत्यावर केला आरोप

Maharashtra Live News Update: कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

High BP: कामाच्या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर कसा नियंत्रित ठेवायचा? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले

Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?

SCROLL FOR NEXT