Man Performs Deadly Stunts On Reckless Driving And Stunts Delhi Police Take Action After Viral Video  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Stunt Video: बापरे! कारचा दरवाजा उघडा ठेवला अन्.. भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी; थरारक VIDEO

Gangappa Pujari

Viral Stunt Video Delhi:

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या अशाच एका भयंकर स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांनी भरधाव एसयुव्ही कारवर जीवघेणी स्टंटबाजी केल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका एसयुव्ही गाडीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये चालक गाडीचे दार उघडे ठेऊन धोकादायकरित्या पळवताना दिसत आहे. गाडीचा दरवाजा उघडा ठेऊन, मोठमोठ्याने गाणी म्हणत तो ही गाडी पळवत आहे. धक्कादायक म्हणजे या गाडीवर पोलिसांचा दिवाही दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

बेदरकारपणे गाडी चालवणे आणि धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ही एसयूव्ही जप्त केली आहे. एसयूव्ही मालकाने नंबर प्लेट काढून गाडीची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. एसयूव्ही जप्त केल्यानंतर पोलीस आता आरोपीला पकडण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, @ANI या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणांना अशाप्रकारे जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी या तरुणावर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.  (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coastal Road : मुंबईकरांसाठी गुडन्यूज! वीकेंडलाही कोस्टल रोड राहणार खुला, पण 'या' वाहनांचा प्रवेश बंद

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

SCROLL FOR NEXT