Electrical accidents : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; कोटामध्ये १५ लहान मुलांना शॉक लागला, तिघांची प्रकृती गंभीर

Rajasthan Shocking News : देशात सर्वत्र महाशिवरात्रीची धामधूम सुरु असताना, राजस्थानच्या कोटामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित रॅलीदरम्यान १५ मुलांना शॉक लागल्याची घटना घटना घडली.
Electrical accidents
Electrical accidentsSaam tv
Published On

Rajasthan Latest News :

देशात सर्वत्र महाशिवरात्रीची धामधूम सुरु असताना, राजस्थानच्या कोटामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित रॅलीदरम्यान १५ मुलांना शॉक लागल्याची घटना घटना घडली. यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलांना शॉक लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानच्या कोटामध्ये महाशिवरात्रीनिमित्त रॅलीमध्ये काही मुलांना शॉक लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे तातडीने रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्यासोबत उर्जा मंत्री हीरालाल नागर देखील रुग्णालयात पोहोचले.

या घटनेतील सर्व जखमी मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोटाच्या संगतपुर येथील १६ ते १९ वयोगटातील मुले हाती झेंडा घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत.

Electrical accidents
Delhi High Court : पत्नीकडून घरातल्या कामांची अपेक्षा ठेवणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

रॅलीतील सहभागी मुलांच्या हातामधील उंच झेंडा हायटेन्शन लाइनला लागला. तर दुसरीकडे रस्त्यावर पाणी होतं. त्यामुळे मोठ्या वेगाने विजेचा धक्का एका पाठोपाठ १४ मुलांना बसला. एका मुलाला सुमारे ७० टक्के विजेचा धक्का बसला आहे. तर दुसऱ्याला ५० टक्के विजेचा धक्का बसला आहे. उर्वरित मुलांना १० टक्के विजेचा धक्का बसला आहे.

Electrical accidents
Shocking News : डायल १०० करण्याआधी घरात घडलं होतं भयंकर; मध्यरात्री बायकोला संपवलं, सकाळी ब्रेकफास्ट, सनकी नवऱ्याचं क्रूर कृत्य

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं की, या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, शहर एसपी अमृता धवन यांनी सांगितलं की, 'ही घटना दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास झाली. या रॅलीमध्ये २०-२५ मुले आणि काही महिला-पुरुष सहभागी झाले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटनेनंतर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये लोक लहान मुलांना घेऊन रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. या घटनास्थळी पोलीस आणि काही लोक हजर आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com